Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 25 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सत्ताधारी भाजपाकडून (Attack on Democracy by BJP) होत आहे. त्यांच्या विरोधात खरे बोलून लोकांमध्ये जनजागृती (public awareness) करणाऱ्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे अडकवायचे प्रकार केले जात आहेत. शासनाच्या खात्यांचा वापर (misuse of government agencies) लोकशाहीची मुल्ये जपणाऱ्यांच्या विरोधात केला जात आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे खासदार राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई (Action taken against MP Rahul Gandhi) असल्याचे मत कॉंग्रेस नेते सचिन रामभाऊ बराटे (Congress leader Sachin Rambhau Barate) यांनी व्यक्त केले. (pune politics)
केंद्र सरकारने राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ खडकवासला विधानसभा काँग्रेस कमिटीच्या (Khadakwasla Vidhan Sabha Congress Committee) वतीने पुण्यातील वारजे हायवे चौकात (Warje) निषेध आंदोलन (Protest in Warje by Congress) करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रदेश काँग्रेसचे सदस्य श्रीरंग चव्हाण पाटील, मिलिंद पोकळे, श्रीकृष्ण बराटे, विजय लगड, अवधूत मते, लहूअण्णा निवंगुणे, शिवदास काळभोर, तुषार जवळकर, अतुल कारले, राजाभाऊ कुंभार, दत्ता झंजे, प्रभाकर भोरकडे, मारुती मोहिते, माऊली बराटे, धनंजय पोकळे, चंद्रकांत बराटे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सचिन बराटे यांनी “भारत जोडो” यात्रेची (Bharat Jodo Yatra) आठवण सांगताना, या यात्रेमुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे नमूद करताना, पुढील काळात भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावे लागणार असल्याचे स्पष्ट होत असल्याने ही कारवाई केल्याचा घणाघात बराटे यांनी केला. तर राहुल गांधी यांचे हे निलंबन भाजपावर उलटेल, राहुल गांधी मोकळ्या वेळात आणखीन मोठे आंदोलन देशभरात उभे करतील. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशात चाललेली लोकशाहीची चेष्टा जनतेसमोर येईल आणि जनता भाजपाला धडा शिकवेल अशी खात्री देखील बराटे यांनी यावेळी व्यक्त केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84