Type Here to Get Search Results !

Dehu: श्री तीर्थक्षेत्र स्वच्छता अधिवेशनास श्रीक्षेत्र देहू येथून प्रारंभ; श्री देवदर्शन यात्रा समितीचा उपक्रम

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

dehu cleanliness drive on ocassion of tukaram bij - checkmate times

पुणे, दि. 23 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): "निसर्ग हाचि वर्ग, एकमेव स्वर्ग | सुशोभुया मार्ग सेवाभावे" या पंक्तीने प्रेरित होऊन "श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे" च्या वतीने संकल्पित "श्री तीर्थक्षेत्र स्वच्छता अधिवेशन"चे (Shri Tirtha Kshetra Cleanliness Convention) पर्व श्री क्षेत्र देहू (Shree Kshetra Dehu) येथून सेवाभावी वृत्तीने सुरू करण्यात आले.

नुकत्याच पार पडलेल्या जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज (Tukaram Bij) सोहळ्याच्या औचीत्याने फाल्गुन एकादशी योगी समिती सदस्यांच्या संकल्पनेतून श्रीक्षेत्र देहू येथे मंदिर आवारात आणि इंद्रायणी नदीतीरी (Indrayani River Dehu) असलेल्या पवित्र घाट परिसरात नि:संकोचपणे स्वच्छता सेवा अर्पण करण्यात आली. या प्रसंगी समिती सदस्यांच्या आवाहनाला साद देत स्थानिक नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन, या पवित्र कार्यास चालना प्राप्त करून दिली. या उपक्रमास हातभार लावलेल्या प्रत्येक उपस्थित व्यक्तींना समितीच्या वतीने प्रशस्तीपत्र, अन् अंतर्गृह रोपटे देऊन गौरविण्यात आले.

काही तरुण आपल्या मंदिर परिसरात उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान राबवित आहेत असे कळताच श्री क्षेत्र देहू मंदिर संस्थानचे (Sri Kshetra Dehu Temple Sansthan) विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे, अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे, माजी विश्वस्त ह.भ.प. रामशेठ मोरे, माजी अध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज मोरे यांनी दखल घेतली. आसपासचा ओला आणि सुका घनकचरा विलग करून त्याचे योग्यरित्या नियोजित कचरा संकलन केंद्रात विघटन करीत सर्व ठिकाणी केलेल्या निर्जंतुकीकरणाने परिसरातील चैतन्य प्रफुल्लित झाले. याचेच कौतुक करत संस्थानिकांनी समितीचा यथोचित गौरव केला. समितीच्या वतीनेही संस्थानिकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमात बबनराव मोरे, देहू ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच शुभांगी मोरे आणि बापू मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समितीच्या वतीने उपस्थित सदस्यांनी सर्वांचे आभार मानले.

हेही वाचा हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावणाऱ्यांवर कारवाई? देवाच्या आळंदीतील प्रकार

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.