Type Here to Get Search Results !

Pune News: धायरी मधील सहा अंगणवाड्यांचे वीज बिल न भरल्यामुळे महावितरणने काढले मीटर

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 4 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगडरस्ता – धायरी (Sinhagad Road Dhayari) परिसरात संचलित सहा अंगणवाड्या आहेत. सर्वसामान्य कुटुंबांतील 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी ही शिक्षण आणि आरोग्याची व्यवस्था शासन करते.

धायरी गाव हे महानगरपालिकेमध्ये (PMC) पाच वर्षांपूर्वी समाविष्ट झाल्यापासून या अंगणवाड्यांची सध्या दुरावस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे. धायरीतील सहा अंगणवाड्यांना वीज बिल न भरल्यामुळे महावितरणने (MSEB) मीटर काढून दिले आहे. त्यातील दोन अंगणवाड्या अजूनही अंधारातच आहेत आणि चार अंगणवाड्यांना समाजाकडून अनेक वर्षापासून वीज पुरवली जाते.

धायरीतील या सहा अंगणवाड्यांना कायमस्वरुपी वीज आणि त्या बिलाची तरतूद जिल्हा परिषदेने (Zilha Parishad), महानगरपालिकेने तातडीने करावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे (Bharatiya Janata Yuva Morcha) सारंग बाळासाहेब नवले (Sarang Balasaheb Navale) यांनी केली आहे.

हेही वाचा - महावितरणचा उपजिल्हा रुग्णालयाला देखील दणका; वीजबिल थकल्याने बंद केले कनेक्शन

याबाबत प्रतिक्रिया व्यक्‍त करताना नवले म्हणाले,“अंगणवाड्यांची अवस्था बघितल्यावर वाईट वाटले. संबंधित अधिकारी या प्रश्‍नावर केव्हा आवाज उठवतील? आपल्या पुढच्या पिढीला आपण असेच शिक्षण देणार आहोत का?, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने या चिमुकल्यांसाठी का अनास्था दाखवली,”

“धायरी ग्रामपंचायत या अंगणवाड्यांचे वीज बिल भरत होती. परंतु गावे समाविष्ट झाल्यामुळे आणि ही अंगणवाडी महानगरपालिकेकडे वर्ग न झाल्यामुळे बिलाचा प्रश्‍न रखडला आहे. समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन करून आम्ही चार अंगणवाड्यांची वीज सुरळीत केली आहे. दोन अंगणवाड्याचांही वीज पुरवठा लवकरच सुरू होईल.” असे गटविकासाचे अधिकारी भूषण जोशी (Bhushan Joshi) म्हणाले.

हेही वाचा - वीज नियामक आयोगाच्या सुनवाईला आम आदमी पार्टी वगळता इतर राजकीय पक्षांची गैरहजेरी

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com           

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes            

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes          

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/          

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times         

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes          

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes        

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n          

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes       

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.