Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 10 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पतीला मार्चमध्ये परदेशात नोकरीसाठी जाण्याचे असल्याने संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज (divorce application) न्यायालयाने त्वरित मंजूर केला. दावा दाखल केल्यापासून 25 दिवसांत हे प्रकरण निकाली काढण्यात आले. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश आर. एस. आराध्ये (Family Court Judge R. S. Aaradhye) यांनी हा आदेश दिला. (Pune News)
मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नी 19 महिन्यांपासून वेगळे राहत होते. त्यातील पतीला मार्च 2023 मध्ये परदेशात नोकरीसाठी जायचे आहे. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. पतीच्या वतीने ॲड. राणी कांबळे-सोनावणे (Adv. Rani Kambale-Sonawane), ॲड. ज्ञानदा कदम (Adv. Dnyanda Kadam), ॲड. आरती परकाळे (Adv Aarti Parkale) आणि ॲड. कल्पना गायकवाड (Adv. Kalpana Gaikwad) यांनी कामकाज पाहिले. तर, पत्नीतर्फे ॲड. तारक पाटील (Adv. Tarak Patil), ॲड. रोहन शेट्टी (Adv Rohan Shetty) यांनी कामकाज पाहिले.
हेही वाचा - घटस्फोटाचा निकाल लागला आणि पतीला आला हृदयविकाराचा झटका; पुण्यातील घटना
रेवती आणि सुबोध यांनी सहा फेब्रुवारी रोजी कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तो 2 मार्च 2023 रोजी मंजूर करण्यात आला. रेवती आणि सुबोध यांचे ऑगस्ट 2019 मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह (Intercast Love Marriage) केला होता. रेवती या पुण्यात नोकरी करतात तर सुबोध परदेशात नोकरीसाठी जाणार आहेत. कोणतीही देवाण-घेवाण न करता त्यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84