Type Here to Get Search Results !

स्वारगेट वरून एसटी घेऊन निघाला दुसरा संतोष माने; सुदैवाने वाचले ५२ प्रवाशांचे प्राण

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 4 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): मद्यधुंद अवस्थेत एस. टी. बस (ST Bus) चालवणं अनेकांना महागात पडलं आहे. तसाच काहीसा अजून एक प्रकार समोर आला आहे. पुरंदर तालुक्यातील (Purandar) पंढरपूर (Pandharpur) पालखी मार्गावर एक एस. टी. चालक मद्यधुंद अवस्थेत एस. टी. चालवत होता. कधी दुभाजकाला कट मारणे, कधी भरधाव वेगाने पळवणे तर कधी नागमोडी बस चालत होती. त्यानंतर थोपटेवाडी फाटा (Thoptewadi Phata) येथे डांबरी रस्ता सोडून साईडपट्टीवरून सुसाट वेगात चाललेली बस प्रवाशांनी बोंबाबोंब करुन थांबवली आणि पुढील दुर्घटना टळली.

माहितीनुसार, पुणे - स्वारगेट – सांगोला (Pune-Swargate-Sangola) बस क्रमांक एम. एच. 14 बी. टी. 3584 ही बस स्वारगेट बस स्थानकातून निघताच दुभाजकाला धडकली. त्यानंतर भरधाव वेगात असा प्रवास सुरु होता. पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी रेल्वे गेटपासून (Pisurti Railway Gate) बस नागमोडी चालू लागली. एक क्षणाला तर समोरुन येणाऱ्या ट्रकला कटही लागला. त्यानंतर बस डांबरी रस्ता सोडून थेट साईडपट्टीवरून चाल लागली. यामुळे प्रवासी भयभीत झाले.

आता प्रवाशांच्या लक्षात आले बहुतेक चालक दारु पिऊन बस चालवत आहे आणि त्यांचा अंदाज खरा ठरला. प्रसंगावधान दाखवत लागलीच प्रवाशांनी बोंबाबोंब केली. बस वाहकाने चालकाला बस थांबण्याची विनंती केली. नागरिकांनी आरडाओरड केल्यानं चालकाने बस थांबवली. त्यानंतर एसटीच्या वाहतूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रवाशांनी चालक दारु पिऊन बस चालवत असल्याची तक्रार केल्याने चालकाला ताब्यात घेत नीरा पोलिसांच्या ताब्यात दिले.

“नियमित तपासणी करताना पालखी मार्गावर 52 प्रवाशी घेऊन सांगोला आगाराची स्वारगेट - सांगोला बस रस्त्याच्या खाली जाऊन थांबली होती. अशा अवस्थेत बस का उभी आहे? असं लक्षात येताच बसमध्ये जाऊन पाहिले तर चालक संतोष विश्वंभर वाघमारे (वय 32, रा. लातूर डेपो सांगोला) हा मद्यधूंद अवस्थेत आढळून आला. सोबत वाहक प्रविण बुरंजे (सांगोला डेपो) हे होते.” असे सहाय्यक वाहतूक निरिक्षक कमर शेख यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com          

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes           

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes         

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/         

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes         

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes       

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n         

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.