Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 21 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): कॅम्पमधील रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना (Rosary Education Group (Camp) Director Vinay Arhana) आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना (Vivek Arhana) यांची 47 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate-ED) सोमवारी (दि. 20 मार्च 2023) जप्त केली. त्यात रोझरी स्कूलची इमारत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जागेचा समावेश आहे.
मिळालेली माहिती अशी कि, विनय अऱ्हाना यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी कॉसमॉस बॅंकेतून (COSMOS Bank) 20 कोटी 44 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु बनावट कागदपत्रांच्या आधारे ही रक्कम घेऊन नूतनीकरणासाठी न वापरता अपहार केला, अशी फिर्याद बँकेचे अधिकारी शिवाजी काळे (Bank Officer Shivaji Kale) यांनी दिली होती. त्यावरून रोझरी स्कूलचे संचालक विनय अऱ्हाना, विवेक अऱ्हाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा समांतर तपास ‘ईडी’कडून करण्यात येत होता.
यादरम्यान, ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी 10 मार्च 2023 रोजी विनय अऱ्हाना यांना अटक केली होती. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांची 20 मार्चपर्यंत ‘ईडी’च्या कोठडीत रवानगी केली. विनय अऱ्हाना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचे बाजारमूल्य 98 कोटी 20 लाख रुपये इतके आहे, अशी माहिती ‘ईडी’ने जारी केलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
हेही वाचा - ऑडी खरेदीसाठी बनावट कागदपत्राद्वारे मिळविले 40 लाखांचे कर्ज; बँक मॅनेरजरसह चौघांवर गुन्हा दाखल
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes