Type Here to Get Search Results !

Pune Crime: ईदच्या वर्गणीच्या नावाखाली दहशत माजवित खंडणी मागणाऱ्या चौघांना मोक्का कायद्यानुसार शिक्षा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

extortion pune crime - checkmate times

पुणे, दि. 16 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): दहशत (terror) माजवत खंडणी (extortion) वसूल करणाऱ्या चौघांना मोक्का न्यायालयाने सहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी 15 लाख 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Pune Crime News)

2 जून 2017 रोजी हा प्रकार घडला होता. याबाबत खडक (khadak) येथील एका महिलेने फिर्याद दिली होती. यांचा चायनीजचा गाडा आहे. खटल्याचे कामकाज सरकारी वकील विजय फरगडे (Public Procecutor Vijay Fargade) यांनी पाहिले.

हेही वाचा - ७ लाखांचे १३ लाख ७० हजार वसूल केले, तरीही आणखीन १३ लाख ५० हजारांची मागणी; अखेर गुन्हा दाखल

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर (S. R. Navandar) यांनी हा निकाल दिला. मोक्कासह (MCOCA) विविध कलमांनुसार ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. अब्दुल गनी खान (Abdul Gani Khan), अक्षय राजेश नाईक (Akshay Rajesh Naik), अक्रम नासीर पठाण (Akram Nasir Pathan) आणि अक्षय अंकुश माने (AKshay Ankush Mane) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा - माथाडी कामगाराच्या नावाखाली १ लाख २६ हजारांची खंडणी मागणाऱ्या दोघे गजाआड

या आरोपींनी फिर्यादीला ईदची (Eid) वर्गणी नावाखाली 3 हजार आणि दरमहा 2 हजार खंडणी मागितली. मात्र फिर्यादीने आता पैसे नसून उद्याची मुदत द्या असे सांगितल्यानंतर त्यांच्यावर अक्षय नाईक याने धारदार शस्त्राने वार करण्याची धमकी देत वस्तूची तोडफोड केली. यातील काही आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

आरोपींनी त्यांच्या टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी टोळीने अनेक गुन्हे केले आहेत, असे तपासात सिद्ध झाले आहे. दंड न भरल्यास चारही गुन्हेगारांना सहा महिने जादा कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                          

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                 

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                  

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes               

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.