Type Here to Get Search Results !

Pune News: एकामागे एक झालेल्या स्फोटांनी धायरी हादरली; पुण्याच्या 6 कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

factory caught fire in dhayri - checkmate times

पुणे, दि. 15 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्याच्या धायरी (Dhayari) परिसरामध्ये लागलेली भीषण आग (Fire) लागली असून या आगीमध्ये 6 छोटे कारखाने (Factory caught fire) जळाले आहेत. ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आलं आहे. 

धायरी येथे लागलेल्या भीषण आगीचा व्हिडिओ पाहा - https://twitter.com/checkmate_times/status/1635883742408605698 

मिळालेल्या माहितीनुसार, फर्निचर, वाहन दुरुस्ती, रंग स्प्रे बनवणे या प्रकारचे हे कारखाने होते. आगीच्या घटनास्थळी सिलेंडर आणि केमिकल बॅरलचे 8-10 स्फोट झाले. तसंच यामध्ये 2 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहनांनीही पेट घेतला होता. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालं नाही किंवा जिवितहानी झाली नाही. संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास ही आग लागली होती, तर 9 वाजता कुलिंग झालं. रंग निर्मिता कारखान्यामध्ये सिलेंडरचा स्फोट (Cylinder explosion in paint factory) होऊन ही भीषण आग लागली होती.

हेही वाचा - पुण्यातील मंगळवार पेठेत भीषण आग

धायरी मध्ये अनेक रूपाने सुरू असलेल्या विविध प्रकारच्या कारखान्यांचा फटका आज सर्वसामान्य नागरिकांच्या वसाहतीला बसला. पुणे (PUNE) आणि पीएमआरडीए (PMRDA) कडच्या 10 वाहनांच्या साहाय्याने अग्निशमन दलाच्या (Fire Station) जवानांनी ही आग पूर्ण विझवली.

या निमित्त नागरी वस्त्यांमधील केमिकल कंपन्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धायरीसारख्या उपनगरांमध्ये मोठं नागरिकरण झाल्याने आता तिथली औद्योगिक वर्कशॉप (Industrial workshop) हे आगीच्या घटनांचं कारण बनू लागलेत. गेल्या वर्षभरातील अशाप्रकारची ही 8 वी घटना आहे, म्हणून पालिकेनं या भागात सुरक्षा संबंधीच्या प्रश्नावर ऑडिट करावं, अशी मागणी धायरीतील रहिवाशांनी केली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                          

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                    

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                 

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes               

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.