Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 14 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): नामांकित ब्रँडचे बनावट कपडे (First Copy of Clothes), उपकरणे, खाद्यपदार्थ आणि मद्यही (Duplicate Liquor) विकले जात असल्याचे समोर येत असताना, आता बनावट सिगारेट (Fake Cigarette) बाजारात येत असल्याचे समोर आले असून, अगोदरच कर्क रोगाकडे घेऊन जाणाऱ्या तंबाखूजन्य सिगारेट बनावट असल्यास, त्या ओढणाऱ्याची कर्क रोगाकडे होणारी वाटचाल कितीतरी अधिक पटीने होणार? हे निश्चित झाले आहे (Cigarette smoking can cause cancer). पुण्यात हा बनावट सिगारेटचा (Fake cigarettes) मोठा साठा मिळून आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. (Pune crime news)
खंडणी विरोधी पथकाने (Anti-Extortion Squad) दिलेल्या माहितीनुसार, आयटीसी (ITC) कंपनीच्या बनावट गोल्ड फ्लॅक सिगारेटची (Gold Flake Cigarettes) विक्री करणार्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून 97 हजार 700 रुपये किमतीचे बनावट सिगारेटचे पॅकेट जप्त करण्यात आले आहेत. खंडणी विरोधी पथकाने काळेवाडी फाटा येथे ही कारवाई केली. मोहनलाल गोमाजी भाटी (वय 51, रा. संभाजीनगर, थेरगाव) (Mohanlal Gomaji Bhati, Thergaon), गणेश सुवालाल गांधी (वय 34, रा. पवारनगर, थेरगाव) (Ganesh Suwalal Gandhi, Thergaon) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा - मेजवानीत दारू आणि सेक्सला बंदी! चाहत्यांसाठी जाहीर केली नियमांची यादी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार (Senior PI Arvind Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरातील काही दुकानदार आयटीसी कंपनीचे (Indian Tobacco Company) उत्पादन असलेली बनावट गोल्ड फ्लॅक सिगारेटची विक्री करीत होते. याबाबत आयटीसी कंपनीच्या (ITC Portal) अधिकार्यांनी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या (Anti-Extortion Squad of Pimpri-Chinchwad Crime Branch) कार्यालयात येऊन तक्रार दिली होती. त्यानुसार, खंडणी विरोधी पथकाने आयटीसी कंपनीच्या अधिकार्यांसोबत मिळून पिंपरी (pimpri) आणि वाकड (wakad) परिसरात छापे मारले.
यामध्ये काळेवाडी फाटा (Kalewadi Phata) येथे गणेश ट्रेडिंग आणि मुकेश किराणा स्टोअर्स येथे पोलिसांना बनावट कॉपीराईट केलेले सिगारेटचे एकूण 29 आऊटर (एक आऊटरमध्ये 20 पॅकेट) असा 97 हजार 700 रुपयांचा साठा आढळून आला. याप्रकरणी वाकड पोलीस स्टेशन (wakad police station) मध्ये कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84