Type Here to Get Search Results !

Pune News: पुण्यात मोर छाप नावाने बनावट जिप्सम आणि सनल्याचे उत्पादन; मशिनरी व साठा सिल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 7 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): कासुर्डी (Kasurdi) (ता. दौंड) येथील पार्वती इंडस्ट्रीज (Parvati Industries) या नावाने सुरू असलेल्या कंपनीत मोर छाप (Mor chhap) नावाने बनावट जिप्सम (Fake Gypsum) व भेसळयुक्त सनला (adulterated sanala plastic powder) तयार केला जात असल्याच्या तक्रारी वरून दौंडच्या उपविभायगीय अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत कंपनी सील केल्याची माहिती यवत पोलीसांनी दिली. (fake material pune crime)

हेही वाचा - ब्रांडेड मालाच्या “फर्स्ट कॉपी” विकणाऱ्या दुकानावर रेड; “कॉपीराईट अ‍ॅक्ट" खाली गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, पार्वती इंडस्ट्रीज या कंपनीत मोर छाप नावाने सनला व जिप्सम प्लॅस्टर बनवले जात होते. मोर छाप नाव, ट्रेडमार्ग व बनावट रजिस्ट्रेशन नंबर वापरून ही भेसळयुक्त उत्पादने बाजारात विकली जात होती.

याबाबत मोर छाप जिप्सम प्लॅस्टर कंपनीचे मालक सुनिल माणिकचंद कासलीवाल (Sunil Manikchand Kasliwal, owner of Mor Chap Gypsum Plaster Company) (रा. मनमाड जि. नाशिक) यांचे तक्रारीवरून यवत पोलीसांत गुन्हा दाखव करण्यात आला असल्याचीही माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - पुणेकरांनो सावधान! बनावट भिकारी करतायेत नागरिकांची लूट

कासुर्डी येथे कंपनीवर पोलीसांनी छापा टाकला तेंव्हा तेथे उत्पादन प्रक्रीया सुरू होती. मुळ कंपनी मोरछाप जिप्सम प्लॅस्टार या कंपनीच्या नावास मिळते जुळती नावे तयार करून न्यू मोरछाप जिप्सम प्लॅस्टर रजि. नं. 2983289 व नंबर वन मोर छाप सनला लाईन पावडर रजि. नं. 3878883 या नावाच्या बॅग मिळून आल्या. ही नावे बनावट असून ट्रेडमार्ग म्हणून वापरलेले क्रमांक हे ट्रेड़मार्क मागणी करण्यासाठी केलेल्या अॅप्लिकेशनचे नंबर आहेत असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

पार्वती इंडस्ट्रीचे मालक निलेश रधुनाथ भोंडवे (Nilesh Radhunath Bhondve, owner of Parvati Industries) हे इतर ब्रॅंडच्या चिन्हाचा (Brand Logo) व नावाचा वापर करून माल विक्री करून शासनाची फसवणूक करतात त्याचबरोबर ट्रेडमार्क कायद्याचे (trademark act) उल्लंघन करतात हे समोर अल्याने त्यांचा मशनरी व साठा सिल (Missionary and Stock Sealed) करण्यात आला आहे. त्याच बरोबर व्यापार चिन्ह कायदा कलम 102, 103, 104 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस (Sub Divisional Police Officer Rahul Dhas) करीत आहेत. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge) यांच्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्ष युवराज पाटील (Sub Inspector of Police Yuvraj Patil), सहाय्यक फौजदार नंदकुमार केकाण (Assistant Faujdar Nand Kumar Kekan), पोलीस हवालदार दिपक वायकर (Police Constable Deepak Waikar), कमलेश होले, अक्षय कुंभार, निलेश कदम, अक्षय यादव, प्रमोद गायकवाड य़ांचा समावेश होता.

हेही वाचा - पोलीस खरे आहेत का खोटे याची अगोदर खात्री करा; पोलीस असल्याच्या बतावणीने पादचारी तरुणाला लुटले

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes           

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/           

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times          

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes           

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes         

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n           

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes        

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.