Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 3 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavhan Centre), सिग्निया (Signia) आणि महात्मा गांधी सेवा संघ (Mahatma Gandhi Seva Sangha) संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे (District Disability Rehabilitation Centre, Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डिजिटल श्रवणयंत्र (Digital Hearing Aids) वाटप शिबीर पार पडले.
75 लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉ. रजनी इंदुलकर (Dr. Rajni Indulkar) यांच्या हस्ते लाभार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. पूर्व तपासणी मध्ये आढळून आलेल्या ऐकू न येण्याच्या क्षमतेनुसार लाभार्थ्यांना दिडशे श्रवणयंत्र मोफत बसविण्यात आले.
हेही वाचा - इंडियन डेंटल असोसिएशन हडपसरच्या वतीने सासवड वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिकांची तपासणी
याप्रसंगी डॉ. रजनी इंदुलकर, डॉ. सुनील जगताप (Dr. Sunil Jagtap), सिवान्टोस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ अविनाश पवार (Avinash Pawar, CEO, Sivantos India Private Limited), किशालया चक्रवर्ती (Kishalaya Chakraborty), सुमुख कसर्ले (Sumukh Kasarle), वायडेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मधुसूदन भाडे (Madhusudan Bhade of Widex India Private Limited), चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नाखले (Chavan Center CEO Dipti Nakhle), विजय कान्हेकर (Vijay Kanhekar), दत्ता बाळसराफ (Datta Balsaraf), दिपिका शेरखाने (Deepika Sherkhane) तसेच कुमार वासनी (Kumar Vasani), विशाल शाह (Vishal Shah), अमित पाटील (Amit Patil) हे उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील कर्णबधिर मुले (Deaf children) आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) 2013 पासून सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून तब्बल 20000 हून अधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे.
चव्हाण सेंटरच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे या करत असलेल्या या स्तुत्य उपक्रमाची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली असून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये सुद्धा त्याची नोंद झाली आहे. बालेवाडी (Balewadi) येथे 2018 मध्ये झालेल्या शिबिरात एका दिवसात म्हणजे अवघ्या 8 तासात तब्बल 4800 लाभार्थ्यांना श्रवणयंत्र बसविण्यात आले होते.
हेही वाचा - आज वारजेकरांच्या या महत्वाच्या आरोग्य समस्यांचे झाले निराकरण; किरण बारटक्के यांनी केले होते आयोजन
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84