Checkmate Times,
Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 29 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील भाजप नेते खासदार गिरीष बापट (Girish Bapat Death) यांचे आज पुण्यात निधन झाले. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 72 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव दुपारी 2 ते 6 पर्यंत शनिवार पेठेतील (Shnivar Peth) निवासस्थानी अंतदर्शनासाठी असेल. सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमी (Vaikunth Smashan Bhumi) येथे अंत्यसंस्कार होतील. (Girish Bapat Passed Away)
खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City President Jagdish Mulik) यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बापट आजारी होते. दरम्यान गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत.
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात किंगमेकर (kasba peth matdarsangh kingmaker) अशी ओळख असणारे गिरीष बापट यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक (Volunteer of Rashtriya Swayamsevak Sangh) राहिले आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक (Corporator) पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट यांनी 1995 मध्ये आमदारकीची पहिल्यांदा निवडणूक लढविली अन् पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले.
यानंतर 1996 साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची (Loksabha) उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे (Anil Shirole) यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी (Mohan Joshi) यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.
हेही वाचा - पाटे डेव्हलपर्सचे संस्थापक व अध्यक्ष बाळासाहेब काशिनाथ पाटे यांचे निधन
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84