Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 30 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): मुलांचा क्लास घेण्यासाठी येणार्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. (Pune Crime News)
मयतेचा भाऊ प्रशांतकुमार दिलीप यादव (Prashant Kumar Dilip Yadav) (वय 25, रा. मोरसा रेसिडेन्सी, उत्तमनगर) यांनी याबाबत फिर्याद (गु. रजि. नं. 44/23) दिली आहे. गुरींदरसिंग (Gurindar Singh) (रा. एनडीए क्वॉर्टर) असे आरोपीचे नाव आहे. उत्तमनगर पोलिसांनी (Uttamnagar Police) त्याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
प्रियंका यादव (Priyanka Yadav) (वय 21, रा. उत्तमनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. हा प्रकार फिर्यादीच्या राहत्या घरी घडली असून 25 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण प्रियंका बी एम सीसी कॉलेजमध्ये एम कॉमचे शिक्षण घेत होती. ती एनडीएमध्ये दोन आर्मी लोकांच्या मुलांच्या घरी जाऊन एक वर्षापासून क्लास घेत होती. 25 मार्च रोजी ती सकाळी उठली व साडेदहा वाजता आंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी बाहेर न आल्याने तिच्या आईने दरवाजा वाजविला, तरी तिने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा फिर्यादीने दरवाजा तोडला असता तिने पाण्याची टाकी ठेवण्यासाठी तयार केलेल्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले.
पोलिसांना बाथरुममध्ये चिठ्ठी मिळाली. त्यात गुरींदरसिंग याच्याबरोबर 7 महिन्यांपासून प्रेमसंबंध आहेत. सुरुवातीला त्याने माझी बायको मला आवडत नाही. मी तिच्याशी घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करणार आहे. परंतु काही दिवसानंतर त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने मला लग्नास नकार दिल्याने मला आत्महत्या करण्याशिवाय कोणताच पर्याय राहिला नाही, असे चिठ्ठीमध्ये लिहिले होते. याच्याबरोबरील फोटो पाहिल्यावर याच गुरींदरसिंग याच्या मुलांना ती शिकवायला घरी जात असल्याचे लक्षात आले.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक चवरे (Assistant PI Chawre) तपास करीत आहेत.
हेही वाचा - लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84