Type Here to Get Search Results !

Pune Crime News | हायवे वर दवा दारूची हवा; दवा’च्या नावाने गोव्याच्या दारूची वाहतूक करणारे गजाआड

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

goa liquor smugglers arrested by talegaon exccise department

पुणे, दि. 13 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): औषधांच्या (Medicine) नावाखाली गोवा राज्यातून अजस्त्र दहाचाकी कंटेनर भरून आणलेली तब्बल 845 बॉक्स दारूची तस्करी (Goa Liquor Smuggling) उघड करण्यात उत्पादन शुल्क विभागाला (Talegaon Excise Department) यश आले आहे. या कारवाई मध्ये एकूण 86 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

तळेगाव (Talegaon) उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. 11 मार्च 2023 रोजी, उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक सी. बी. राजपूत (District Superintendent of Excise Department C. B. Rajput), उपअधीक्षक युवराज शिंदे (Deputy Superintendent Yuvraj Shinde), एस. आर. पाटील (S R Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय सराफ (Excise Inspector Sanjay Saraph), दुय्यम निरीक्षक दीपक सुपे (Deepak Supe), प्रियंका राठोड, सहायक दुय्यम-निरीक्षक सागर धुर्वे (Assistant Sub-Inspector Sagar Dhurve), आर. सी. लोखंडे तसेच जवान तात्याबा शिंदे, राहुल जांजाळ, संजय गोरे यांच्या पथकाने सोमाटणे गावाजवळ (Somatane Village) ही कारवाई केली.

उत्पादन शुल्क विभागाला टीएन 69 बीबी 2170 (TN 69 BB 2170) या दहाचाकी कंटेनर मधून औषधांच्या नावाखाली गोवा बनावटीची दारू तस्करी (wine trafficking) करून आणली जात असल्याची महिती मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने सोमाटणे भागात सापळा लावून सशयित कंटेनर थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारू आणि बिअरचे (Goa Liquor and Beer) तब्बल 845 बॉक्स आढळून आले. तर या कंटेनर मधून औषधांची वाहतूक करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत होते.

या दारूच्या तस्करी प्रकरणी कंटेनर चालक शंकरलाल नारायण जोशी (वय 46, रा. जैन मोहल्ला, बस्सी, ता. सलुंबर, जि. उदयपूर, राजस्थान) (Shankarlal Narayan Joshi) याला अटक करण्यात आली असून, त्याचा दुसरा साथीदार ओम पुरी (Om Puri) फरार झाला आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून हा तब्बल 84 लाखांचा मुद्देमाल जप करण्यात आला आहे.

हेही वाचा - बापरे... पुणे बनत आहे तस्करीचे केंद्र; पूर्ण प्रकरण वाचाल तर अवाक व्हाल

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.