Type Here to Get Search Results !

NCP Pune: देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादीची मागणी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

ncp demands sedition charges against gopichand padalkar - checkmate times

पुणे, दि. 29 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी देशाचे तुकडे करण्याची भाषा करून देशद्रोह (Sedition) केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) केला आहे. (Sedition charges against Gopichand Padalkar) या संदर्भात पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. 28 मार्च 2023) पोलीस आयुक्त रितेश कुमार (Police Commissioner Ritesh Kumar) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पडळकर यांनी देशाचे तुकडे करण्याची भाषा केल्याबाबत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी, याबाबत राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात पडळकर हे काही महिन्यांपासून गरळ ओकत आहे.

तसेच पडळकर यांनी इंदापूर (Indapur) येथील जाहीर सभेत पडळकर यांनी पवार आडनाव असलेल्या अठरापगड जाती - धर्मातील कुटुंबीयांचा आणि त्यांच्या जातीचा अवमान केला आहे. यापैकी आदिवासी व मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही वादग्रस्त वक्तव्याबद्दल पडळकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

हेही वाचा NCP Pune | महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

‘लवासा, बारामती आणि मगरपट्टा हे तीन राज्य करण्यात यावेत. या तिन्ही राज्यांचा मिळून एक वेगळा देश निर्माण करून शरद पवार यांना पंतप्रधान करावे’, असे वादग्रस्त वक्तव्य पडळकर यांनी केले होते. त्यांचे हे वक्तव्य भारताच्या संघराज्य व्यवस्थेला छेद देणारे आहे. याबाबत पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे निवेदनात म्हटले आहे. पोलीस आयुक्त याबाबत गांभीर्याने विचार करून कार्यवाही करतील, अशी अपेक्षा शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Pune City President Prashant Jagtap) यांनी व्यक्त केली.

या शिष्टमंडळात प्रवक्ते प्रदीप देशमुख (Spokesperson Pradeep Deshmukh), किशोर कांबळे (Kishor Kambale), महेश पवार (Mahesh Pawar), माधव पवार (Madhav Pawar), मधुकर पवार (Madhukar Pawar), महेश हंडे (Mahesh Hande), शशिकांत जगताप (Shashikant Jagtap), दीपक कामठे (Deepak Kamathe), शुभम मताळे (Shubham Matale) यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.