Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 28 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): बारामतीमध्ये (baramati) पवारांच्या नेतृत्वाबद्दल प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांच्या विरोधात जाण्याची मानसिकता तरुण पिढीमध्ये झाली आहे. या भागातील तरुणांचे संघटन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या (bhartiya janata paksha yuva morcha) 52 शाखा बारामती-इंदापूरमध्ये (baramati – indapur) सुरू करण्यात आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी व्यक्त केली.
बारामती-इंदापूर तालुक्यात भाजप युवा मोर्चाच्या 52 शाखांचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bavankule) व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते रविवारी (दि. 26 मार्च 2023) झाले. या वेळी पडळकर माध्यमांशी बोलतांना म्हणाले कि,“मागील अनेक वर्षे राज्यातील प्रमुख नेतृत्व येथील नेत्यांकडे होते. मात्र येथील अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. पळशी येथे आम्ही शाखा उद्घाटनासाठी गेलो होतो. त्या वेळी तेथील ग्रामस्थांनी पुरंदर उपसाच्या पाण्याबाबत तक्रारी केल्या. तेथे पाणी वेळेवर मिळत नाही. त्याची दर आकारणी अधिक असल्याने हा दर कमी करावा, अशी त्यांची मागणी होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुरंदर येथील सभेला आले होते. तेव्हा त्यांनी या उपसा योजनेचे दर कमी केले. जानाई-शिरसाई पट्ट्यातील गावांमध्येसुद्धा दुष्काळ आहे.”
ते पुढे म्हणाले,”’मिशन बारामती लोकसभा' यासाठी शाखा सुरू करण्यात आल्या नाहीत. भाजपचे हे तर रूटीन वर्क आहे. वर्षातले 365 दिवस भाजप या पद्धतीने काम करते. गावगाड्यातील विविध प्रश्न या शाखांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी व तरुणांची फळी उभी करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे.”
तसेच ”देशातील मान्यवर नेत्यांना तुम्ही बारामतीला आणायचे, स्वत:चे कौतुक करून घ्यायचे, पाठ थोपटून घ्यायची, असा टोला पडळकर यांनी पवार कुटुंबाला लावला. या भागाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर येथील गाऱ्हाणी घालण्यासाठी आज आम्ही येथे आलो आहोत.” असे पडळकर या वेळी म्हणाले.
“जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिण्यापासून ते उर्दूमध्ये त्यांचे पोस्टर लागण्यापर्यंत उद्धव ठाकरे यांचे विचार परिवर्तन झाले आहे. हिंदुत्वापासून ते कोसो दूर गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे ज्या ताकदीने या देशात हिंदुत्वाचे काम करत होते. त्याच्याबरोबर विरूद्ध दिशेला उद्धव ठाकरे यांची विचारसरणी गेली आहे. आता त्यांच्याकडे पर्याय नाही. हिंदुत्व त्यांच्याकडे राहिले नाही. त्यामुळे अशा लोकांना बरोबर घेतल्याशिवाय त्यांना त्यांचे राजकारण करता येणार नाही.” अशी टीकाही पडळकर यांनी केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84