Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 28 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील हिंदू बांधवांकडून हिंदू नववर्षाच्या (Hindu New Year) स्वागतानिमित्त वारजे हायवे चौक (Warje highway Chowk) ते गणपती माथ्यापर्यंत (ganapati Matha) शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही पक्ष, सामाजिक संघटना अथवा सामाजिक कार्यकर्त्यांनी (Non Political) आयोजित न केलेल्या या यात्रेमध्ये महिला, लहान मुलांसह हजारोंच्या संख्येने हिंदू सहभागी झाले होते.
या शोभायात्रेमध्ये समाजातील विविध घटकांचा आणि वेगवेगळ्या संस्थांनी आवर्जून सहभाग नोंदवला. विशेषतः तीन रथांमध्ये महापुरुषांच्या वेषभुषेमध्ये अनेक मुले सहभागी झाली होती. सनातन प्रभात (Sanatan Prabhat), हिंदू जनजागृती संस्था (Hindu Janjagruti Samiti), प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय (Prajapati Brahmakumari Eshwariya University), विश्वमांगल्य सभा (Vishwamangalya Sabha) आणि श्री. अनिरुद्ध बापूंचे अनुयायी (follower of Sri Aniruddha Bapu) या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्याचबरोबर पारंपारिक शंख वादक, वासुदेव, बजरंग दलाचे (Bajarang Dal) विविध शस्त्रे चालविण्यात प्रशिक्षित बाल यांच्या सहभागाने शोभायात्रेला एक वेगळीच उंची गाठता आली. शोभायात्रेच्या वाटेत वारजे व्यापारी संघटनेने (Warje Vyapari Sanghatana) सगळ्यांसाठी पाणी, सरबताची व्यवस्था केली होती. या शोभायात्रेची सांगता वारजे मधील ऐतिहासिक (Historical Temple) पावशा गणपती मंदिरात महाआरतीने झाली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84