Type Here to Get Search Results !

Hadapsar News: रस्त्यात गेलेल्या जागेचा मोबदला न दिल्याने जागामालकाने पत्रे लावून रस्ता केला बंद

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

land owner closed road as tdr amount not received from pmc - checkmate times

पुणे, दि. 29 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): गेली चार वर्षांपासून पाठपुरावा करूनही महापालिकेकडून विकसन हक्क हस्तांतरण (Transfer of development rights - TDR) होत नसल्याने जागामालकाने काळेपडळकडे (Kalepadal) जाणारा डीपी रस्ता (DP Road) पत्रे लावून बंद केला आहे. त्यामुळे परिसरातील हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, येथील सर्व्हे नंबर 54 मधील हांडेवाडी रोड, महात्मा फुले चौक, जेएसपीएम कॉलेज, कुमार केबल पार्क सोसायटी (Kumar Cable Park Society) येथील डीपी रस्त्याजवळील संपादीत जागेचा विकसन हक्क हस्तांतरण (TDR) पालिकेकडून अद्यापही देण्यात आलेला नाही. त्यासाठी जागामालक गेली चार वर्षांपासून महापालिकेत पाठपुरावा करीत आहे. मात्र, पालिका प्रशासनाची त्याबाबत उदासीनता दिसून येत आहे.

पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने जागामालकाने सोमवारी (दि. 27 मार्च 2023) या रस्त्यावर पत्रे लावून वाहतूक बंद केली आहे. सुरूवातीला पालिकेने या रस्त्याचेडांबरीकरण केले होते. त्यानंतर नुकतेच काँक्रीटीकरणही करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावरून मोठ्याप्रमाणात वाहतूक वाढली आहे. मात्र, कालपासून वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांना मोठा वळसा घ्यावा लागत आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. 

याबाबत जागामालक योगेश घुले (Owner Yogesh Ghule), विश्वास भापकर (Vishwas Bhapkar) म्हणाले कि,“डीपी रस्त्यासाठी आमची जागा पालिकेने संपादीत करून तेथून अठरा मीटरचा रस्ता विकसीत केला आहे. मात्र, मोबदला म्हणून देण्यात येणारा टीडीआर चार वर्षे पाठपुरावा करूनही मिळालेला नाही. अधिकारी त्याबाबत चालढकल करीत आहेत. त्यामुळे आम्ही रस्ता बंद केला आहे.”

हेही वाचा - CKY आणि KKY कडून नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; पुण्यात गुन्हा दाखल

“महापालिकेच्या संबंधीत अथिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक जागामालकाला टीडीआर देण्यात दीरंगाई केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थी, कामगार व इतर प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. हा प्रश्न लवकर न सोडविल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल.” असे माजी नगरसेविका विजया वाडकर (Ex-Corporator Vijaya Wadkar) यांनी सांगितले.

याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) व बांधकाम निरिक्षक प्रकाश कुंभार (Construction Inspector Prakash Kumbar) यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधन्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.