Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 4 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वेल्हे (Velhe) तालुक्यातील करंजावणे (karanjawane) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने एका हाँटेल कामगाराचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला झाला होता. याचे पडसाद अधिवेशनात पडल्याचे पहायला मिळाले. यावर आमदार संग्राम थोपटे (MLA Sangram Thopate) यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी तेवढ्याच तत्परतेने दखल घेत याबाबत लवरकच बैठक घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
3 जानेवारी 2023 रोजी करंजावणे येथील आरोग्य केंद्रात गणेश महादेव सावंत (Ganesh Mahadev Sawant) या कामगाराचा उपचार न मिळाल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांनी याचा संताप व्यक्त केला होता. याबाबत वेल्हे पोलिसात (velhe police station) देखील याची नोंद करण्यात आली होती. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सध्या अधिवेशन सुरु असल्याने भोर (Bhor), वेल्हे, मुळशीचे (Mulshi) विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी याबाबत अधिवेशनात आरोग्य मंत्र्यांना घटनेची आप बीती सांगितली. आपल्यापर्यंत ही घटना पोहचली असून याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा करून लवकरच यावर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले.
“गेली अनेक दिवसापासून भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील आरोग्य केंद्रांचा प्रश्न ऐरणीवर आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी पुरेसे डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत” अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84