Type Here to Get Search Results !

Pune Crime: हॉटेलच्या चेन असलेल्या व्यावसायिकाचा सप्लायर्सला तब्बल ७३ लाखांचा गंडा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 7 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): शहरातील एका हॉटेल व्यावसायिक दांपत्याने दूध, मासे, कोळसा व किराणा दुकानदारांची बिले थकवून 73 लाख 65 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Defraud) केली. याप्रकरणी अवधेशकुमार उपाध्याय (Avdheshkumar Upadhyay) (वय 39, रा. केशवनगर) यांनी फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Senior Police Inspector Rajendra Landge) यांनी याबाबत माहिती दिली. याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी शौकत अली खान (Shaukat Ali Khan) व त्याची पत्नी रेणुरतन शौकत अली खान (Renuratan Shaukat Ali Khan) (रा. पंचशल टॉवर, खराडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, उपाध्याय यांचा दूध व दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय आहे. 2016 मध्ये आरोपींच्या हॉटेल व्यवस्थापकासोबत त्यांचा परिचय झाला. त्याने मालक शौकतअली खान याच्यासोबत उपाध्याय यांची ओळख करून दिली. त्यानुसार उपाध्याय यांनी त्यांच्या शहरातील सात हॉटेलला दुग्धजन्य पदार्थ पुरविले. 2019 पर्यंत त्यांच्यात व्यवस्थित व्यवहार सुरू होता.

मात्र, त्यानंतर दोन महिन्यांचे 39 लाख रुपये थकले व आरोपींनी उपाध्याय यांना पैसे दिले नाहीत. 2022 मध्ये आरोपीने पत्नी रेणुरत शौकतअली खान यांच्या सहीचे 16 व इतर काही, असे एकूण 19 धनादेश उपाध्याय यांना दिले. बँकेत हे धनादेश वटले नाहीत.

दरम्यान, उपाध्याय यांनी माहिती घेतली असता कोळसा व्यावसायिकाचे 6 लाख 84 हजार रुपये, मासेवाल्याचे 6 लाख 82 हजार, भाजीवाल्याचे 19 लाख 23 हजार, तर दुकानदारांचे 1 लाख 74 हजार असे एकूण पाच जणांचे 73 लाख 65 हजार रुपयांचा माल घेऊन पैसे न देता फसवणूक केल्याचे समोर आले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes           

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/           

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times          

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes           

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes         

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n           

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes        

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.