Type Here to Get Search Results !

Pune Crime News: सर्वांच्या नजरेआड अफूची शेती; कोणत्या शेतकऱ्यांच्या या करामती?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 3 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): इंदापूर (Indapur) तालुक्यातील पाच शेतकर्‍यांनी थेट सामुहिक अफूची शेती (Opium Cultivation) केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 2 मार्च 2023) दुपारी उघडकीस आला. अंदाजे दीड एकर क्षेत्रावर ही अफूची झाडे असून, त्यांची एकूण किंमत व अफूची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांची नावे अद्यापी समजू शकली नाहीत. (pune crime news)

रात्री उशिरापर्यंत इंदापूर पोलिसांकडून (indapur police) या अफूच्या शेतीची पाहणी सुरू होती. तालुक्यातील पळसदेव (palasdev), माळवाडी (Malwadi) आणि शेलारपट्ट्यातील (Shelar Patta) पाच शेतकर्‍यांनी मक्याच्या पिकात (Corn crop) आंतरपीक म्हणून थेट सामुहिक अफूची शेती केली. विशेष म्हणजे या अफूची पूर्ण वाढ झाली असून, त्याची बोंडेदेखील वर आली आहेत.

हेही वाचा - ग्रामपंचायतीच्या कर आकारणीला वैतागून कृषी व्यावसायिकांनी “गांजा उद्योगाला” मागितली परवानगी

मात्र, तरीही ही अफूची शेती कोणाच्याच नजरेस पडली नाही. दरम्यान, पोलिसांना गुरुवारी (दि. 2 मार्च 2023) दुपारी या शेतीचा सुगावा लागला आणि तब्बल दीड एकरातील ही अफूची शेती आढळून आली आणि एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत इंदापूर पोलीस या शेतीची पाहणी करीत होते. या अफूची एकूण किंमत किती होईल याचा आकडा आज (दि. 3 मार्च 2023) कळण्याची शक्यता आहे. यापैकी पळसदेव नजीकच्या मक्याच्या शेतात आंतरपीक म्हणून केलेली अफूची शेती ही पोलिसांचेही डोळे विस्फारणारी ठरली. संबंधित शेतकर्‍यांना ही अफूची शेती चांगलीच महाग पडण्याची शक्यता आहे.

होळकरवाडी येथेही अफूची शेती

होळकरवाडी (Holkarwadi) परिसरात बेकायदेशीररीत्या केल्या जात असलेल्या अफूच्या शेतीवर लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) छापा (Raid) टाकत ती शेती उद्ध्वस्त केली. यावेळी 11 लाख 60 हजारांची तब्बल 1374 अफूची झाडे पोलिसांनी जप्त केली आहे. शेती करणार्‍या दोन शेतकर्‍यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (pune crime news)

राजाराम दामोदर होळकर (Rajaram Damodar Holkar) (होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) आणि बाळू किसन कटके (Balu Kisan Katke) (वय - 50, रा. पाटीनगर, होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हेही वाचा - पुणे पोलिसांनी ७६१ किलो गांजा, कोकेन, मेफेड्रोन, चरस, हेरॉईनची केली होळी

पोलीस आयुक्त रितेश कुमार (Commissioner of Police Ritesh Kumar), सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint Commissioner Sandeep Karnik) व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी आयुक्तालयातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण (Senior Police Inspector Dattatray Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना होळकरवाडी परिसरात औताडेवाडीकडून होळकरवाडी जाणार्‍या ओढ्यातील चिमणी तलावाच्या शेजारी गव्हाच्या शेतात अफूची शेती केली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. उपलब्ध माहितीच्या आधारे लोणी काळभोर पोलिसांचे पथक होळकवाडी येथे बुधवारी (दि. 1 मार्च 2023) दुपारी दाखल झाले.

दरम्यान, बेकायदेशीररीत्या केली जात असलेली शेती पोलिसांनी कारवाई करत उद्ध्वस्त केली. यावेळी 11 लाख 60 हजार रुपये किमतीची 116 किलोग्रॅम वजनाची 1 हजार 374 अफूची झाडे जप्त करण्यात आली. होळकरवाडी येथील सर्वे नंबर 180 आणि सर्व्हे नंबर 183 येथे अफूच्या शेतीवर कारवाई करण्यात आली. यावेळी दोन्ही शेतमालकांना पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करत अटक केली आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे (Sub-Inspector of Police Amit Gore) करीत आहेत. अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (Additional Commissioner of Police Ranjan Kumar Sharma), उपायुक्त विक्रांत देशमुख (Deputy Commissioner Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (Assistant Commissioner of Police Bajrang Desai), वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय चव्हाण (Senior Inspector Dattatraya Chavan), निरीक्षक सुभाष काळे (Inspector Subhash Kale), उपनिरीक्षक अमोल घोडके (Sub Inspector Amol Ghodke), अमंलदार साळुंके, वीर कुदळे, नानापुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.