Type Here to Get Search Results !

हिंदू धर्माचे कार्यच दुष्टांचे निर्दालन करणे आहे, त्यामुळे अशा हिंसेचे मी उघड समर्थन करतो: कालीचरण महाराज

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

 


पुणे, दि. 14 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स):  दुष्ट प्रवृत्तींच्या संहारासाठी हिंसा आवश्यक आहे, असे हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान सांगते. त्यामुळेच हिंदूंचे सर्व देवी-देवताही हिंसक आहेत. हिंदू सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदू धर्माला मारक आहे. हिंसा हाच हिंदू धर्माचा आधार आहे, असे परखड मत कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केले. 

checkmate times advertisement

धर्मजागरण सभेच्या निमित्ताने कालीचरण महाराज पुण्यात आले होते. या सभेच्या आधी त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. यावेळी धर्मजागरण सभेचे आयोजक शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक नागपुरे (Deepak Nagpure Founder of Shiv Samarth Pratishthan), पुणे शहर भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला (Pune City BJP Spokesperson Ali Daruwala) आदी यावेळी उपस्थित होते. “देशात काही ठिकाणी विशिष्ट समुदायातल्या युवकांवर जमावाने हिंसेच्या घटना घडत आहेत. अशा घटनांबद्दल मनात कोणतीही खंत नाही. हिंदू धर्माचे कार्यच दुष्टांचे निर्दालन करणे हे आहे. त्यामुळे अशा हिंसेचे मी उघड समर्थनच करतो.” अशा शब्दांत कालीचरण महाराजांनी मॉब लिंचिगला पाठिंबा दिला.

हेही वाचा - पुणे शहरात मातृ पितृ पूजन दिन उत्साहात साजरा; व्हॅलेंटाईन डे मात्र सुकला

“या धर्मजागरण सभेचा उद्देश जात, भाषा, प्रांत अशा वादांमध्ये अडकलेल्या हिंदू समाजाची मोट बांधून कट्टर हिंदू व्होटबँक बनविणे हा आहे. अशी व्होट बँक बनविणे हेच साधूंचे कार्य आहे. समाजाचे हित साधणारा तो साधू या न्यायाने मी माझे कार्य करीत आहे.” असेही कालीचरण महाराज यांनी सांगितले.

“हिंदू मुलींनी इतर धर्मीयांशी केलेल्या विवाहाचे परिणाम आपण बघतोच आहोत. लव्ह जिहादच्या दररोज देशभरात चाळीस हजार घटना होत आहेत. याला आळा घालण्यासाठीही हिंदूंनी संघटीत होणे गरजेचे आहे. मुस्लिम समाज संख्येने कमी असतो तोवर भाईचारा असल्याचे दिसते. मात्र, त्यांची संख्या वाढल्यावर ते त्याच भाईला आपला चारा बनवतात. धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय संविधानाच्या मूळ उद्देशिकेत नव्हता. तो शब्द इंदिरा गांधी यांनी घटनादुरुस्तीद्वारे घुसवला आहे. त्यामुळे अशा बेगडी धर्मनिरपेक्षतेला काहीच अर्थ नाही.” असेही कालीचरण महाराज यांनी सांगितले.

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची प्रभू श्रीरामाशी तुलना करताना, कालीचरण महाराज म्हणाले, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी योगी आदित्यनाथ अतिशय प्रभावी काम करत असून देशभरातल्या समस्त हिंदूंच्या संघटनाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता त्यांच्या अंगी आहे. भविष्यात हिंदुस्थानात रामराज्य आणण्याचे स्वप्न ते साकार करू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                        

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                    

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                 

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                  

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes               

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.