Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
हेही वाचा - अँड. ऋषिकेश कोळपकर यांची बार असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड
कोरोना (Corona) उद्रेकादरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभाग (PMC Health Department) प्रमुखपदी राज्य सरकारने (State Government) डॉ. भारती यांची नियुक्ती केली. त्यांना 30 सप्टेंबर 2020 रोजी एका वर्षासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख पदावर प्रतिनियुक्तीचे आदेश दिले. त्यांचा हा कालावधी संपल्यानंतर 5 ऑक्टोबर 2021 ते 4 ऑक्टोबर 2022 या दरम्यान पुन्हा एका वर्षासाठी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर भारती यांना मुदतवाढ दिल्याचे पत्र आलेले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर डॉ. भारती यांच्या बदलीचे आदेश आले. त्यामुळे रिक्त झालेल्या आरोग्य प्रमुख पदाचा कार्यभार महापालिकेच्या आरोग्य विभागातील उपप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
डॉ. बळीवंत यांना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील वेगवेगळ्या पदांवर कामाचा अनुभव आहे. त्या 1998 मध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागात निवासी वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) म्हणून रुजू झाल्या.
महापालिकेतील आरोग्य विभाग प्रमुख पदावर परत राज्याच्या आरोग्य खात्यातून कोणी अधिकारी प्रतिनियुक्तीवर येणार की, विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पूर्णवेळ या पदाचा कार्यभार सोपविला जाणार, या बाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. या निवडीसाठी जाहिरात देऊन अर्ज मागविण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतरच निवडलेल्या अधिकाऱ्याकडे पदाचा कार्यभार सोपविण्यात येईल. तोपर्यंत डॉ. बळीवंत यांच्याकडे या पदाची सूत्रे राहणार आहेत.
हेही वाचा - उच्चशिक्षित महिला सरपंच यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी निवड
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84