Type Here to Get Search Results !

Pune Crime News | कर्वेनगर मध्ये वडिलांनी केला स्वत:च्या मुलीचा विनयभंग; वडील आणि आजी विरोधात गुन्हा दाखल | POCSO Act

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

 

father raped daughter in karvenagar

पुणे, दि. 11 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): आईचे निधन झाल्यानंतर दुसरे लग्न (Second Marriage) करण्याचा विचार करत असलेल्या वडिलांना त्यांच्या 13 वर्षाच्या मुलीने विरोध केल्याच्या रागातून वडिलांनी मुलीचा विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार “स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले” यांच्या स्मृतीदिनी आणि जिथे स्त्री शिक्षणाची मोठी चळवळ उभी राहिली त्या “महर्षी धोंडो केशव कर्वे” यांच्या कर्वेनगर (Karvenagar) मधून समोर आली आहे. याबाबत मुलीच्या तक्रारीवरून पोक्सो कायद्यानुसार (POCSO Act) वडिलांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी कर्वेनगरमधील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने वारजे पोलीस स्टेशन मध्ये (Warje Police Station) वडिल व आजीविरोधात तक्रार दिली आहे. सदरील प्रकार 2020 पासून सातत्याने घडत असल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. तसेच वडिलांनी फिर्यादीच्या बहिणीसोबत देखील अतिप्रसंग (Attempt to Rape) करण्याचा प्रयत्न केला असल्याचे या मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा - पुण्यात दोन सख्या भावांकडून तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, मोबाइलमध्येही केलं शूट

सदरील तक्रारदार मुलीच्या आईचे 2022 मध्ये निधन झाले आहे. यानंतर वडील दुसरे लग्न करत असल्याने त्यांना विरोध करत असल्याच्या रागातून वडिलांनी फिर्यादीस विनाकारण शिवीगाळ करुन तसेच फिर्यादी घरात वावरत असताना फिर्यादीच्या अंगाला स्पर्श करुन त्यांच्या प्रायव्हेट पार्टला हात (Bad Touch) लावून विनयभंग केला. तर विरोध करणाऱ्या मुलीची आजी देखील विनाकारण त्या मुलीला मारहाण करते, बदनामी (Defamation) करण्याचा प्रयत्न करते, अशीही तक्रार मुलीने दिली आहे. यावरून पोक्सो कायद्यानुसार वडिलांना अटक करण्यात आली आहे. वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके (Senior Police Inspector Dagadu Hake), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ता बागवे (Crime Police Inspector Datta Bagwe) पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल (Sub-Inspector of Police Manoj Bagal) पुढील तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.