Type Here to Get Search Results !

Pune Accident: कात्रज नवीन बोगद्याजवळ विचित्र अपघातात मोटारी झाल्या अल्टी पल्टी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 6 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): कात्रज नवीन बोगद्याच्या (Katraj Bogda) बाहेर कोळेवाडी (Kolewadi) हद्दीत तीन कारचा विचित्र अपघातात पुणेच्या दिशेने येणाऱ्या तीन गाड्यांचा चक्काचुर झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. (pune accident)

परंतु, झालेल्या अपघातात फुटलेल्या काचांचा खच, अस्ताव्यस्त पडलेले गाड्यांचे पार्ट, पलटी झालेल्या गाड्या आणि गाडीतून जिवाच्या आकांताने अपघातग्रस्तांनी फोडलेला टाहो पाहून प्रत्यक्षदर्शीना धडकी भरली.

त्यानंतर, सजग नागरिकांनी तत्काळ जखमींना बाहेर काढले. शिवाय पोलिसांनाही वर्दी देण्यात आली. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे (Bharti Vidyapeeth Police Station) पोलीस पोहचले. तसेच जखमींना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये तत्काळ दाखल करण्यात आले.

नवलेपुल ते नवीन कात्रज बोगदा, जांभूळवाडी दरीपुल (Jambhulwadi Bridge) हा परिसर अपघाताचा हॉटस्पॉट ठरत असून, यावर ठोस उपाय करण्याची योजना आखली जावी अशी मागणी होते आहे.

हेही वाचा - कात्रज झालंय समस्यांचे आगार; विकास आघाडीने धिक्कार आंदोलन करून घेतला समाचार

नवीन बोगदा ते नवले पुल (Navale Bridge) दरम्यान असणारा तीव्र स्वरूपाचा उतार, उतारावर न्यूट्रल केली जाणारी वाहने, वाहनांची अतिरिक्त वेग मर्यादा, हुल्लडबाज ड्रायव्हिंग तसेच मद्यपान केलेले वाहन चालक अशी अपघाताची काही करणे आहेत.

याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Bharti Vidyapeeth Police Station Senior Police Inspector Vijay Kumbhar) म्हणाले कि,“अपघाताची वर्दी मिळताच तत्काळ आपले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.यात जीवितहानी झालेली नाही.”

दुपारी तीनच्या सुमारास खेड शिवापूरहून पुण्याच्या दिशेने येत असताना आमच्या समोरच अपघात घडला. मी तत्काळ अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी गेलो. शिवाय पोलिसांनाही कळविले.काही लोकांनी आम्हाला मदत केली तर जास्तीत जास्त लोक फोटो आणि व्हिडिओ काढण्यात दंग झाले होते. अपघातावेळी मदत करणे आपले पहिले कर्तव्य असायला हबे.” असे प्रत्यक्षदर्शी (Eyewitness) अ‍ॅड. दिलीप जगताप (Adv. Dilip Jagtap) म्हणाले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes           

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/           

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times          

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes           

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes         

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n           

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes        

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.