Type Here to Get Search Results !

Khadakwasla I खडकवासला जलविद्युत प्रकल्प झाला पूर्ण; पहिली चाचणीही यशस्वी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 10 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): विविध कारणांमुळे अनेक वर्षांपासून रखडलेला खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) पाण्यावर उभारण्यात आलेला जलविद्युत प्रकल्प अखेर पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाची चाचणीही यशस्वी झाली असून लवकरच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. (Pune News)

या धरणाच्या मुठा उजवा कालव्यातून सिंचनासाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यातून 1.2 मेगावॉट वीजनिर्मिती (Electricity Generation) करण्यात येणार आहे. खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याबाबत 2006 मध्ये राज्य शासनाकडून (State Government) मंजूरी मिळाली होती. त्यानुसार या प्रकल्पात 600 किलोवॉटच्या दोन जनित्रांद्वारे 1.2 मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. हे वीजनिर्मितीचे काम बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी-BOT) तत्त्वावर एका कंपनीला देण्यात आले आहे.

हेही वाचा - टेमघर धरण दुरुस्ती प्रकल्पाला लवकरच शासनाकडून मान्यता मिळणार ...

या कंपनीने डिसेंबर 2010 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, कालवा बंद करून खोदाईचे (Mining) काम करण्यास कंपनीला परवानगी मिळाली नाही. त्यानंतर कोरोना (Covid-19) आणि त्यानंतर कामगारांची वानवा या व अशा कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते. आता या प्रकल्पाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून त्याची चाचणीही यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण यांच्याकडून परवानगी घेण्यात येत असून लवकरच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील (Vijay Patil) यांनी दिली.

दरम्यान, वीजनिर्मितीसाठी खडकवासला धरणात सुरुवातीलाच पॉवर हाऊस (Power House) बांधण्यात आले आहे. पाणी सोडल्यानंतर या पॉवर हाऊसमध्ये जनित्रांद्वारे वीजनिर्मिती केली जाणार आहे. वीज तयार झाल्यानंतर ते पाणी पुन्हा कालव्यात सोडले जाईल. खडकवासला धरणातून कालव्यात वर्षभरात 170 दिवस पाणी सोडले जाते.

हेही वाचा - खडकवासला ते फुरसुंगी बोगदा; माती तपासणीचे काम प्रगतीपथावर

त्यामुळे वर्षातील सहा महिने या प्रकल्पातून वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे. वीज तयार झाल्यानंतर ती महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (Maharashtra State Power Generation Company Limited) किंवा महानिर्मितीला (Maha Nirmiti) विकत देण्यात येणार असल्याचेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.