Type Here to Get Search Results !

Khed-Shivapur Toll Naka: खेड-शिवापूर टोलनाका हटाव; संघर्ष समितीचे आंदोलनाचे पाऊल, 2 एप्रिलला सर्वपक्षीय आंदोलन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Khed Shivapur Toll Naka Agitation - checkmate times

पुणे, दि. 17 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): खेड-शिवापूर टोल नाक्यावर (Khed Shivapur Toll Naka) सक्तीने सुरू असलेली टोल वसुली व स्थानिक नागरिकांना होत असलेली दादागिरी याबाबत टोलनाका संघर्ष समितीने आंदोलनाचे पाऊल उचलले असून, येत्या 2 एप्रिल 2023 ला टोलनाका संघर्ष समितीच्या वतीने सर्वपक्षीय तीव्र आंदोलन टोल नाक्यावर होणार असल्याची घोषणा संघर्ष समितीच्या आजच्या बैठकीत करण्यात आली.

खेड शिवापुर टोलनाका हटाव बाबत पुढील भूमिका ठरवण्यासाठी टोल नाका हटाव संघर्ष समितीची बैठक आज केळवडे (Kelwade) येथे पार पडली. या बैठकीत खेड-शिवापूर टोलनाक्यावर सुरू असलेल्या सक्तीच्या टोलवसुलीबाबत नागरीकांमधे संतप्त भावना तयार झाली असून टोलनाक्याच्या स्थलांतराचा मुद्दा जाणीवपुर्वक बाजुला ठेऊन महामार्ग प्राधिकरण टोलवसुली सक्तीने करीत आहे. अशी भावना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा - खेडशिवापूर टोल वसुलीचा ठेका ज्या राजकीय पक्षाच्या नेत्यांकडे असेल, त्यांना मतदान करू नका; खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे आवाहन 

“खेड-शिवापूर टोलनाका स्थलांतरीत करण्याची मागणी जनतेतून व लोकप्रतिनिधींकडून होत असुनही महामार्ग प्राधिकरण व टोल प्रशासन मुजोरी करीत आहेत. यापुर्वी केलेल्या आंदोलनामधे टोल प्रशासनाने दिलेला शब्द फिरवला आहे. आता टोलनाक्याचा अंतिम लढा 2 एप्रिल रोजी टोलनाक्यावर दिला जाईल. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गावागावात जाउन आंदोलन जनतेपर्यंत पोहोचवावे.” असे आवाहन कृतीसमितीचे निमंत्रक माउली दारवटकर (Mauli Darwatkar convener of KrutiSamiti) यांनी केले आहे.

यावेळी होणारे आंदोलन आर या पार असेच होणार असून टोल नाक्यावर दादागिरी होते, त्रास होतो, असे म्हणत घरात न बसता नागरीकांनी या होणाऱ्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून आपली स्थानिक ताकद दाखवावी व टोल आपल्या हद्दीतुन हद्दपार करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले. तर “आपण आधी भुमीपुत्र आहोत, नंतर पक्षाचे पदाधिकारी आहोत. ही लढाई श्रेयवाद किंवा पक्षभेदात अडकून रहाता कामा नये.” अशी अपेक्षा कृती समितीचे डॉ. संजय जगताप (Dr. Sanjay Jagtap) यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर आज पासून स्थानिकांची टोलमाफी रद्द; टोलनाक्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता

यावेळी प्रत्येक पक्षाच्या तालुका निहाय आंदोलकांच्या समितीची स्थापना करण्यात आली व आंदोलनासाठी सर्वपक्षीय मेळावे भोर (bhor), वेल्हा (velhe), हवेली (haveli) या तालुक्यांमधे घेण्यात येणार असून काँग्रेस (congress), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (shivsena), भारतीय जनता पक्ष (bjp), कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस (ncp), मनसे (mns), किसान मोर्चा (kisan morcha) या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्या विरूद्ध एल्गार केला.

या बैठकीला निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, डॉ. संजय जगताप, भोर तालुका काँग्रेस अध्यक्ष शैलेश सोनवणे (Bhor Taluka Congress President Shailesh Sonwane), भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड (BJP District Vice President Balasaheb Garud), माजी सभापती लहुनाना शेलार (Former Speaker Lahunana Shelar), भाजप तालुकाध्यक्ष जिवन कोंडे (BJP taluka president Jeevan Konde), शिवसेना तालुकाप्रमुख माऊली शिंदे (Shiv Sena taluka chief Mauli Shinde), हनुमंत कंक, युवा सेनेचेआदित्य बोरगे, वेल्हे तालुकाप्रमुख दिपक दामगुडे, भरत किन्हाळे, राष्टशक्ती संघटनेचे शहाजी अरसुळ, रामभाऊ मांढरे, गोरख मानकर, शुभम यादव, अरविंद सोंडकर, दादा पवार, दादा आंबवले, महेंद्र भोरडे, आदी उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                           

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.