Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 27 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): खेड-शिवापुर टोलनाका (Khed Shivapur Toll Naka) हटवण्यासाठी टोलनाका संघर्ष समितीने जाहीर केलेल्या आंदोलनाची जोरदार तयारी चालु आहे. संघर्ष समितीच्या सदस्यां बरोबर चर्चा करण्यासाठी भोर (Bhor), हवेली (Haweli) प्रांताधिकारी व महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी (Project Officer of Highways Authority) यांनी राजगड पोलीस ठाण्यात (Rajgad Police Station) आयोजित केलेल्या बैठकी मध्ये संघर्ष समिती अंदोलनावर ठाम असल्याने अधिकाऱ्यांनी दोन दिवसात जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक अयोजीत करण्याचा निर्णय घेऊन बैठक अटोपती घेतली.
2 एप्रिल 2023 रोजी संघर्ष समितीच्या वतीने टोलनाक्यावर टोलहटाववर आंदोलन केले जाणार आहे. तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी व कार्यकर्त्यांकडुन आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच अंदोलनाबाबत मार्ग निघावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने संघर्ष समितीच्या बरोबर नसरापूर (Naraspur) राजगड पोलीस ठाण्यात बैठकीचे अयोजन करण्यात आले.
या बैठकीत संघर्ष समितीच्या सदस्यांनी महामार्ग प्राधिकरण व प्रशासकीय अधिकारयांवर प्रश्नांची सरबत्ती केली संतप्त प्रतिक्रीया टोल हटवणे हिच आमची मागणी आहे. त्यासाठी तुम्ही आधिकारी प्रयत्न करा आम्ही आंदोलन थांबवु शकत नाही, अशी ठाम भुमिका मांडली. प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम यांनी महामार्ग प्राधिकरणाची भुमिका मांडण्याचा यावेळी प्रयत्न केला टोल माफी संदर्भात महामार्ग प्राधिकरणाने पत्र दिले नसुन टोलव्यवस्थापनाने दिले असल्याचे सांगुन टोल माफी संदर्भात व टोल हटवण्या संदर्भात निर्णय माझ्या हातात नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रांताधिकारी असवले यांनी टोलचा स्थानिक नागरीकांना त्रास आहे हे मान्य आहे परंतु त्या मधुन योग्य मार्ग काढला गेला पाहीजे. अंदोलन होताना कोणताही अऩुचित प्रकार न होता कायदा व सुव्यवस्था कायम राहवी, असे आवाहन केले. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे (District Magistrate Rajendra Kachare) यांनी बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने या मधील मुद्दे धोरणात्मक निर्णयाचे असुन या बाबत जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकतात त्यांची दोन दिवसात वेळ मिळते आहे अंदोलना आगोदर ही बैठक अयोजीत करुन चर्चा करण्यात येईल असे सांगितले.
या बैठकीस हवेलीचे प्रांताधिकारी संजय असवले (Haveli District Officer Sanjay Aswale), भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे (Bhor District Magistrate Rajendra Kachare), उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील (Sub Divisional Police Officer Dhananjay Patil), महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम (Sanjay Kadam, Project Officer, Highways Authority), भोरचे तहसिलदार सचिन पाटील (Bhor Tehsildar Sachin Patil), हवेलीचे तहसिलदार किरण सरवदे (Haveli Tehsildar Kiran Sarwade), टोल ठेकेदार कंपनीचे अमित भाटीया (Amit Bhatia of Toll Contractor Company), राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील (Rajgad Police Inspector Sachin Patil) व काही अधिकारी तर टोल संघर्ष समिती कडुन ज्ञानेश्वर माऊली दारवटकर (Dnyaneshwar Mauli Darvatkar), शैलेश सोनवणे (Shailesh Sonawane), वेल्हे तालुक्यातील शंकरराव भुरुक (Shankarao bhuruk), माजी सभापती लहुनाना शेलार (Lahunana Shelar), सुनिल कांबळे (Sunil Kambale), स्वप्निल कोंडे (Swapnil Konde), राजेंद्र कदम (Rajendra Kadam), सचिन बदक, अरविंद सोंडकर, दाद आंबवले, गणेश खुटवड, शुभम यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84