Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 1 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): किरकटवाडी (Kirkitwadi), नांदेड (Nanded) येथील ओढ्यातून वाहणार्या मैलापाणी, सांडपाण्याच्या दुर्गंधीने (Bad Odour) हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने (PMC) ओढ्यांची पाहणी करून दुर्गंधीचा त्रास कमी करण्यासाठी औषध फवारणी (Medicinal spray to reduce odour nuisance) सुरू केली आहे.
एकीकडे दाट लोकवस्त्या, सोसायट्यांचे सांडपाणी व मैला प्रकिया न करताच थेट सोडले जात आहे. तर दुसरीकडे ओढे-नाल्यांची सफाई केली जात नसल्याने दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत. याचा फटका किरकटवाडीसह नांदेड, सिंहगड रोड (Sinhagad Road) भागातील तीस हजारांहून अधिक नागरिकांना सहन करावा लागत आहे.
याबाबत सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे (Sinhagad Road Regional Ofiice) सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड (Assistant Commissioner Pradeep Awad) म्हणाले,”ग्रामपंचायत काळापासून परिसरातील मैलापाणी, सांडपाणी प्रक्रिया न करता थेट ओढ्यात सोडले जात आहे. महापालिकेत दोन वर्षांपूर्वी हा भाग समाविष्ट झाला आहे. मुख्य खात्यामार्फत मैलापाण्यासाठी ड्रेनेजलाईन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक निधीची गरज आहे. असे असले तरी ओढे- नालेसफाईची सफाई करणे, रोगराई पसरू नये यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.”
दरम्यान, ओढ्यातील मैलापाणी, दुर्गंधीमुळे आसपासच्या रहिवाशांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. दुर्गंधीमुळे दरवाजे बंद करावे लागत आहेत. याकडे खडकवासला मनसेचे उपाध्यक्ष रमेश करंजावणे (Khadakwasla MNS Vice President Ramesh Karanjawane) व माजी उपसरपंच नरेंद्र हगवणे (Former Deputy Sarpanch Narendra Hagwane) यांनी लक्ष वेधले होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84