Type Here to Get Search Results !

Koyta Gang: सिंहगड रोड परिसरात पुन्हा कोयता गॅंग सक्रीय

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

koyta gang attack in sinhagad road - checkmate times

पुणे, दि. 20 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) नांदेड फाट्याजवळ (Nanded phata) असलेल्या गोसावी वस्ती येथे कोयता गॅंग (Koyta Gang) पुन्हा सक्रिय झाली असून एका तरुणावर अज्ञात कारणावरुन हल्ला करण्यात आला आहे. (Pune Crime News)

विजय विठ्ठल मरगळे (Vijay Vithhal Margale) (वय 31, रा. नांदेड ता. हवेली जि पुणे) असे या हल्ल्यात जखमी (Injured) झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी सुरज उर्फ सागर संतोष सहा (Suraj alias Sagar Santosh Saha) (वय 21), मुकुंद उर्फ मुक्या चंद्रकांत चव्हाण (Mukund alias Mukya Chndrakant Chavhan) (वय 23), शुभम उर्फ झेंड्या दिलीप पवार (Shubham alias Zendya Dilip Pawar) (वय, 22) व अजय विजय आठवले (वय 19) सर्व राहणार गोसावी वस्ती (Gosavi Vasti) यांच्यावर हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनाही अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय मरगळे हा गोसावी वस्ती येथील त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. मित्र आणि तो खाली इमारतीच्या पार्किंगला थांबलेले असताना अचानक हातात कोयते, लोखंडी रॉड घेऊन आलेल्या पाच ते सहा जणांनी विजयवर हल्ला केला. या हल्ल्यात विजय मरगळे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - Koyta Gang: कोयता गँग’ची कोंढवे धावडे मध्ये भाईगिरी; धारदार शस्त्रे दाखवून नागरिकांमध्ये पसरवली दहशत

पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार (PI Sadashiv Shelar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम (Assistant PI Nitin Nam) याबाबत अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान ज्या तरुणावर हल्ला झाला तो अभि मारणे या त्याच्या मित्राकडे गेला होता. अभि मारणे (Abhi Marne) हा एका गंभीर गुन्ह्यात अनेक दिवसांपासून फरार आहे. तो फरार असताना त्याच्या घरी येऊन राहतो तरीही पोलीसांना याची खबरही लागत नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर तो पुन्हा फरार झाला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                           

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.