Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 9 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): कोथरूडमधील महात्मा सोसायटीजवळील (Mahatma Society, Kothrud) टेकडीवर चर खोदले जाणार होते. पण नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेने तेथील काम बंद पाडले आहे. (pune news)
महात्मा सोसायटीच्या पाठीमागे टेकडी आहे. यातील काही भाग हा पुणे शहराच्या जुन्या हद्दीतील आहे, तर काही भाग हा 1997 ला आलेल्या गावांमधील आहे. या टेकडीवर परिसरातील नागरिक सकाळी फिरण्यासाठी जातात, टेकडीचे रक्षण झाले पाहिजे यासाठी ते सतर्क आहेत.
दरम्यान, डुक्कर खिंडीच्या बाजूने टेकडीवर खोदकाम केले जात असल्याचे नागरिकांच्या (Residents) निदर्शनास आले. ही जागा बीडीपीतील (Bio-Diversity Park-BDP) असल्याने तेथे बांधकाम करण्यावर मर्यादा आहेत, तसेच त्यासाठी परवानगीही (Permission) घ्यावी लागते. या टेकडीवर चर खोदून पुढे बांधकाम केले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे काही जागरूक नागरिकांनी यासंदर्भात तक्रार केली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून काम बंद करायचे आदेश दिले.
याबाबत शहर अभियंता प्रशांत वाघमारे (Prashant Waghmare) म्हणाले,”ही जागा बीडीपीमध्ये येते. काम बंद करण्याचे आदेश खासगी जागा मालकाला देण्यात आले आहेत. तसेच भविष्यात तेथे बांधकाम होणार नाही याकडे आमचे लक्ष आहे.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84