Type Here to Get Search Results !

अवैद्य धंद्यांवर कारवाई करायला लावणाऱ्या एका संघटनेच्या कार्यकर्त्यांचे अपहरण करून खून

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 1 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पेरणे फाटा (perna phata) येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीची पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून एका संघटनेच्या कार्यकर्त्याचा अपहरण करून खून करणार्‍याला लोणीकंद पोलिसांनी (lonikand police) अटक केली. मागील दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. (pune crime news)

सचिन बाळू वारघडे (Sachin Balu Varghade) (वय 30, रा. ढेरंगे वस्ती कोरेगाव भीमा, ता. शिरुर) असे त्याचे नाव आहे. वारघडे याने 2020 मध्ये गोविंद कुमकर (govind kumkar) यांचा साथीदारांच्या मदतीने कट रचून खून केला होता. कुमकर हे एका संघटनेचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. परिसरातील अवैध धंद्याची माहिती ते पोलिसांना कळवून कारवाई करण्यास विनंती करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी पेरणे फाटा येथे दारू विक्री करणारी महिला सुनीता चमरे (Sunita Chamre) हिच्या अवैध धंद्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला (Police Control Room) दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तिच्या अवैध धंद्यावर कारवाई केली होती. त्याचा राग वारघडे याच्या मनात होता. (pune crime news)

दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी कुमकर हे कामानिमित्त बाहेर निघाले होते. कुमकर यांना विधिसंघर्षित बालिकेच्या मदतीने भेटण्यास बोलावून आरोपी बाळू वारघडे, सुनीता चमरे, सत्यम चमरे (Satyam Chamre), शुभम चमरे (Shubham Chamre), राहुल वारघडे (Rahul Varghade), सचिन वारघडे यांनी कोयता, कुर्‍हाडीने वार करून कुमकरचा खून (murder) केला. त्यानंतर चारचाकी गाडीतून त्यांचा मृतदेह पिंपरी सांडस (pimpri sandas) येथील वनक्षेत्रात पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने फेकून दिला होता. यापूर्वी सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती.

मात्र त्यापैकी, सचिन वारघडे हा फरार होता. त्याचा शोध घेत असताना, सायबर तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे (Sub-Inspector of Police Suraj Gore, Head of Cyber Investigation Team), कर्मचारी समीर पिलाने (Samir Pilane) यांना सचिन हा बहुळ (Bahul) या गावी राहात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar), गुन्हे निरीक्षक मारुती पाटील (Crime Inspector Maruti Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे, कर्मचारी बाळासाहेब सकाटे (Balasaheb Sakate), समीर पिलाने, सचिन चव्हाण, मल्हारी सपुरे (malhari sapute), सागर पाटील (sagar patil) यांच्या पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. (pune crime news)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.