Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 21 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पतीने धावत्या रेल्वेतून पत्नी आणि मुलीला ढकलून दिल्याची (The husband pushed his wife and daughter from the running train) घटना खडकी रेल्वेस्थानक (Khadki Railway Station) परिसरात रविवारी (दि. 19 मार्च 2023) घडली. त्यात दोनवर्षीय बालिकेचा मृत्यू झाला असून, पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Pune Crime News)
आकाश भोसले (Akash Bhosale) असे आरोपीचे नाव असून तो एक सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आर्या आकाश भोसले (Arya Akash Bhosale) (रा. पद्मावती) असे मृत बालिकेचे नाव आहे. तिची आई वृषाली (vrushali akash bhosale) (वय 22) ही गंभीर जखमी झाली आहे. या संदर्भात लोहमार्ग पोलिसांनी पती आकाश भोसले याला अटक केली आहे. लोहमार्ग पोलिसांनी या घटनेबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश याने पत्नी वृषालीला हाजी अली दर्ग्यात (Haji Ali Darga) दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले होते. तो पत्नी आणि मुलीला घेऊन रेल्वेने मुंबईला जात होता. खडकी रेल्वे स्थानक परिसरात आल्यानंतर त्याने पत्नीला दरवाजाजवळ बोलावून घेतले. आर्या वृषालीच्या कडेवरच होती. वृषाली बेसावध असतानाच आकाशने दोघी मायलेकींना जोरात धक्का मारून रेल्वेतून ढकलून दिले. प्रवाशांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली.
हेही वाचा - Pune Crime: 'ती'ने आत्महत्या केल्याच्या धक्क्याने तिच्या होणाऱ्या नवऱ्यानेही केली आत्महत्या
या घटनेत वृषाली आणि मुलगी आर्या या दोघी गंभीर जखमी झाल्या. पोलिसांनी दोघींना ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) दाखल केले. परंतु उपचारादरम्यान आर्याचा मृत्यू झाला. आकाश एका खुनाच्या गुन्ह्यात सध्या जामिनावर बाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84