Type Here to Get Search Results !

Jijamata Bank: जिजामाता सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगलदास बांदल मैदानात

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

jijamata bank election - checkmate times

पुणे, दि. 21 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): जिजामाता सहकारी बॅंकेच्या (Jijamata Sahakari Bank) पंचवार्षिक निवडणुकीसाठी (5 Year Election) जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल (Former Chairman of Zilla Parishad Mangaldas Bandal), त्यांच्या पत्नी रेखा बांदल (Rekha Bandal) व शिरूर बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे (Shirur Bazaar Committee Director Abaraje Mandhare) हे उतरले आहेत.

मागील पंचवार्षिकमध्ये आमदार अशोक पवार (Mla Ashok Pawar) यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार (Former Chairperson of Zilla Parishad Sujata Pawar) व जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य पंडित दरेकर (Former Member of District Planning Board Pandit Darekar) हे दोघे बिनविरोध विजयी झाले होते. यावेळी मात्र सुजाता पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या नाहीत.

सुमारे 22 हजार सभासद मतदार असलेल्या पुण्यातील जिजामाता सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक 15 एप्रिल रोजी आहे. ही निवडणूक 13 संचालक रिक्त जागांसाठी होत असून, एकूण 12 शाखांपैकी 3 शाखा शिरूर (Shirur), शिक्रापूर (Shikrapur) व मांडवगण फराटा (Mandavgan Farata) येथे कार्यरत आहेत. एकूण मतदारांपैकी 6500 मतदार शिरूरचे आहेत. त्यामुळे ही निवडणूक शिरुरकरांसाठीही महत्त्वाची आहे. एकूण 13 पैकी 8 जागा या महिला संचालकांच्या मागील वेळी 25 किलोमीटर कक्षेबाहेरील महिला संचालक म्हणून सुजाता पवार या माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर (Zilla Parishad Member Shekhar Pachundkar) यांच्या माघारीने बिनविरोध; तर खुल्या वर्गातून पंडित दरेकर (Pandit Drekar) हे निवडून गेले होते.

हेही वाचा - जामीनाचे सर्व सोपस्कार पूर्ण करून अखेर मंगलदास बांदल कारागृहाबाहेर

यावेळी मात्र निवडणुकीत राजकीय रंग भरला असून यात बांदल व मांढरे यांच्या उमेदवारीमुळे राजकारण ढवळून निघणार आहे. आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक असलेले विद्यमान संचालक जाकिरखान पठाण (Director Zakirkhan Pathan) व सणसवाडीचे (Sanaswadi) पंडित दरेकर यांचे बंधू उत्तम दरेकर (Uttam Darekar) यांनी अनुक्रमे ओबीसी (OBC) व खुल्या गटातून (Open) अर्ज भरले आहेत.

काका खळदकर (Kaka alias Dnyandev Khaladkar) पुन्हा रिंगणात आमदार अशोक पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून तालुक्यात ओळखले जाणारे काका ऊर्फ ज्ञानदेव खळदकर यांनी या निवडणुकीत पहिल्यांदाच आपली पत्नी संगीता खळदकर (Sangita Khaladkar) यांना उतरविले आहे. घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीत काका खळदकर यांचा अर्ज बाद ठरला होता. त्यामुळे शिरूरमध्ये राजकारणही चांगलेच रंगले होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.