Type Here to Get Search Results !

Pune News: खारावडे मध्ये यंदाही बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळा; सहभागी होण्यासाठी संपर्क साधा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 9 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): खारावडे (ता. मुळशी) (Karawade, Mulshi) येथे येत्या 7 मे 2023 रोजी बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह (samudayik vivah) सोहळ्याचे आयोजन केले आहे. चंद्रकांत अण्णा भरेकर (chandrakant anna bharekar) व श्री. म्हसोबा देवस्थान ट्रस्ट खारावडे (shri. Mhasoba Devsthan Trust, Kharawade) यांच्या सौजन्याने हा विवाह सोहळा होणार आहे.

गेली तीन वर्षे कोरोनामुळे हा उपक्रम होऊ शकलेला नाही. यावर्षी येत्या 7 मे 2023 रोजी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. या विवाह सोहळ्यास नव वधू-वरास आशीर्वाद देण्यासाठी श्री क्षेत्र नारायणपूरचे सद्‍गुरु नारायण महाराज (Sadguru Narayan maharaj, narayanpur) उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजक गणेश भरेकर (Ganesh Bharekar) यांनी दिले.

खारावडे येथे सन 2003 पासून या सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरवात केली. या सोहळ्यात नववधूस दोन साड्या, परकर, ओढणी; तसेच नववरास सफारीचे कापड देण्यात येते. तसेच, नवदांपत्यासह संसारोपयोगी 21 भांड्याचा संच देण्यात येतो. विवाह सोळ्यास येणाऱ्या सर्व वऱ्हाडी मंडळीची भोजनाची सोय केलेली आहे.

सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वधू-वरांस नाव नोंदणी (registration) करावी लागते. नाव नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आतापर्यंत या सोहळ्यात पाचशेपेक्षा जास्त जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.

सहभागासाठीच्या नाव नोंदणीसाठी सुभाष रोकडे (98227 43910) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/              

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times             

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes              

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes            

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n               

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes           

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.