Type Here to Get Search Results !

नवनाथ रेणुसे खून प्रकरणात ८ जण गजाआड; वेल्हे मध्ये गोळीबार करून करण्यात आला होता खून

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

 

पुणे, दि. 9 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वेल्हे (Velhe) तालुक्यात नवनाथ ऊर्फ पप्पूशेठ नामदेव रेणुसे (Navnath alias Pappu Namdev Renuse) (वय-38) याचा वेल्ह्यात विसावा हॉटेल मध्ये सोमवार (दि. 6 मार्च 2023) रोजी गोळ्या झाडून तोंडावर धारधार शस्त्र (सत्तुर, चाकुने, कुकरी) ने वार करून निघृण खून केल्याची घटना घडली होती. जमीन व्यवहारात हस्तक्षेप आणि एक वर्षांपूर्वी मुलाचा झालेल्या मृत्यूला नवनाथ हा जबाबदार असल्याच्या कारणावरून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी पोलिसांनी माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे (mauli alias dnyaneshwar lakshman renuse) (वय 56) (रा. पाबे, ता. वेल्हा, जि. पुणे, सध्या (रा. 225, 226, काळभोरवाडा, शुक्रवार पेठ, पुणे), आकाश कुमार शेटे (Akash Kumar Shete) (वय 24), रा. 191, शुक्रवार पेठ, पुणे), यश ऊर्फ प्रथमेश विनायक चित्ते (Yah alias Prathmesh Vinayak Chitte) (वय-22) (रा. 206, शुक्रवार पेठ, पुणे), अक्षय गणेश साळुंखे (Akshay Ganesh Salunkhe) (वय-27) (रा. 191, शुक्रवार पेठ, पुणे), शुभम राजेश थोरात (Shubham Rajesh Thorat) (वय-21) (रा. 218, शुक्रवार पेठ, पुणे, मुळ रा. भालगुडी, ता. मुळशी, जि पुणे) यांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेल्हे तालुक्यातील पाबे (Pabe) येथे राहणारा नवनाथ रेणूसे याचा खून करण्यात आला होता. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे हा साथिदारासह किरकटवाडी, ता. हवेली, जि. पुणे या ठिकाणी आला होता. त्यानुसार पोलिसांनी त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. (Pune Crime News)

माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे याच्या जमीनीच्या व्यवहारात मृत नवनाथ ऊर्फ पप्पु नामदेव रेणुसे हा हस्तक्षेप करीत होता. तसेच माऊली रेणुसे याचा मुलगा एक वर्षांपूर्वी मयत झाला होता. त्याच्या मृत्युस नवनाथ रेणुसे हाच जबाबदार असल्याचा समज त्याच्या मनात होता. यावरून त्याचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.

हा गुन्हा करण्यापुर्वी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली लक्ष्मण रेणुसे यांनी त्यांची पत्नी कुंदा ज्ञानेश्वर रेणुसे (वय 45), मुलगी पल्लवी भूषण येणपुरे (वय 30), मुलगी गौरी अमोल ऊर्फ शशीकांत शिंदे (वय 27) यांचेसह मिळून सदरचा गुन्हा करण्याचा कट तयार केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.

सर्व आरोपींना अटक करणेत आलेले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 15 मार्च 2023 पर्यंत पोलीस कोठडी दिली असुन या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील (Police Officer Bhausaheb Dhole Patil) हे करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/              

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times             

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes              

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes            

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n               

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes           

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.