Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 6 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): काही दिवसांपूर्वीच पुण्यातील उत्तमनगर (Uttamnagar) भागात आईने पाच वर्षाच्या मुलीचा चटके देऊन, मारहाण करत खून केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच, आता पुण्यातील खडकी मधून दुसरी धक्कादायक घटना समोर आली असून, अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या अडीच वर्षांच्या पोटच्या मुलीला प्रियकराच्या मदतीने आईनेच मारून टाकल्याची घटना समोर आली आहे. तर कोणतेही धागेदोरे नसताना, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत त्या दोघा नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेमुळे शहरासह खडकी (Khadki) परिसरात मोठी खळबळ उडाली होती. (Pune Crime News)
हेही वाचा - आईची स्वार्थी वृत्ती ओळखून नातीचा ताबा आजी-आजोबांकडे
पोटच्या लेकीचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराला खडकी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. लक्ष्मी (laxmi) (32, रा. अकोला), संतोष देवमन जामनिक (Santosh Devman Jamnik) (वय 31 वर्ष रा. दापोडी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी अकोला (Akola) येथे पतीसोबत राहत असून तिचा पती व्यसनी असल्याने तिचे सदर गावातील मुलगा संतोष याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. संतोष हा कामानिमित्त पुणे (pune) येथे आल्याने लक्ष्मीने तिच्या माहेरील लोकांना नातेवाईकाकडे जाते सांगून घरातून गेली. आपल्या दोन मुली व एक मुलगा हा माहेरी ठेऊन सर्वात छोटी असलेली मुलगी सोबत घेऊन नातेवाईकाकडे न जाता आठ दिवसापूर्वी तिचा प्रियकर संतोषकडे पुण्यात आली होती. पुण्यात राहत असताना दोघांनी तिचा खून केला. नंतर मुलीचा मृतदेह खडकी येथील मोकळ्या मैदानात टाकून दिला.
हेही वाचा - उत्तमनगर मध्ये ५ वर्षांच्या मुलीचा आईने केला खून; फिट येऊन बेशुद्ध पडल्याचा केला बहाणा
याबाबत पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार देखील देण्यात आली नव्हती. त्यामुळे खडकी पोलीस आणि गुन्हेशाखेच्या पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही धुंडाळले त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष त्यांना जाताना दिसले. महिलेच्या खांद्यावर मुलगी दिसत होती. याच सीसीटीव्हीचा धागा पकडत पोलीस दोन्ही आरोपींपर्यंत पोहचले. (Pune Crime News)
पोलीस आयुक्त रितेश देशमुख (Commissioner of Police Ritesh Deshmukh), सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint Commissioner Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ram Nath Pokle), उपायुक्त अमोल झेंडे Deputy Commissioner Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Khadki Police Station Senior Police Inspector Vishnu Tamhane) यांच्या पोलीस ठाण्याचे पथक आणि गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने ही कारवाई केली. प्राथमिक तपासात अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याने खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असले तरी दोघांनी तिचा खून का केला याचा पोलीस शोध घेत आहे. तपासात महत्वपूर्ण बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84