Type Here to Get Search Results !

MSEDCL: तब्बल ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव; महावितरणने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे केला सादर

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

electricity rates may go up from 1st april 2023 - checkmate times

पुणे, दि. 30 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुढील दोन वर्षांसाठी तब्बल 37 टक्के म्हणजे सरासरी 2 रुपये 55 पैसे प्रतियुनिट दरवाढीचा प्रस्ताव (Proposal to increase electricity rates) महावितरणने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यास आयोगाकडून मान्यता मिळाली तर 1 एप्रिल 2023 पासून राज्यात वाढीव वीजदर लागू होण्याची शक्यता आहे.

प्रत्यक्षात ही दरवाढ 37 टक्के म्हणजे सरासरी 2 रुपये 55 पैसे प्रतियुनिट वाढीची असल्याचे वीज ग्राहक संघटनांचे (Electricity Consumers Association) म्हणणे आहे. त्यामुळे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व शेतकरी अशा सर्व वर्गवारीतील ग्राहकांना वीजदारात मोठी वाढ होणार आहे.

महावितरणने 26 जानेवारीला 37 टक्के वीजदरवाढीची फेरआढावा याचिका राज्य वीज नियामक आयोगाकडे (State Electricity Regulatory Commission) सादर केली. या याचिकेत 2019-20 पासून 2024-25 या सहा वर्षांतील 67 हजार 644 कोटी रुपयांच्या महसुली तुटीच्या भरपाईची मागणी केली आहे. त्यासाठी सध्याच्या वीजदरात 2023-24 व 2024-25 या दोन आर्थिक वर्षांत अनुक्रमे 14 टक्के आणि 11 टक्के अशी सरासरी दरवाढ आयोगाकडे प्रस्तावित केली आहे.

“वीजदरवाढीच्या विरोधात राज्यभरातून दहा हजार हरकती आयोगाकडे दाखल करण्यात आल्या, तसेच 28 फेब्रुवारीला राज्यभरातील तेवीस जिल्ह्यात पन्नासहून अधिक ठिकाणी वीजदरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात आली,” असे समितीचे निमंत्रक व ज्येष्ठ वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे (Convenor of Committee and senior electrician Pratap Hogade) यांनी सांगितले.

हेही वाचा - MSEDCL News | वारजे माळवाडी मधील विस्कळीत वीज पुरवठ्यावर महावितरणचा पालिका प्रशासन आणि ठेकेदाराला शॉक

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.