Type Here to Get Search Results !

Mulshi Kitab Kusti | जिल्हास्तरीय ‘मुळशी किताब’ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन; रविवारी अंतिम सामना

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, pune sports, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news 

mulshi kitab kushti

पुणे, दि. 10 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या (Maharashtra State Wrestling Association) नियमाने व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या (Pune City Wrestling Association) मान्यतेने घोटावडे फाटा (ता. मुळशी) (Ghotawade Phata, mulshi) येथील चौकात रविवारी (दि. 12 मार्च 2023) जिल्हास्तरीय ‘मुळशी किताब’ (Mulshi Kitab) अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे.

हेही वाचा - महिलांचे शोषण करण्याच्या आरोपात पुण्यातून देखील कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी

स्पर्धेचे हे सलग सतरावे वर्ष आहे. एकूण सात वजनगटात भरविलेल्या या स्पर्धेतील विजेत्या सर्व मल्लांना एकूण सुमारे सहा लाख रुपये रकमेची रोख बक्षीसे वितरित करण्यात येणार असून, मुळशी किताब विजेत्यास रोख एकतीस हजार रुपये व मानाची चांदीची गदा (chandichi gada) बहाल करण्यात येणार आहे. या आखाड्यात प्रतिष्ठानच्यावतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मिरघे (Senior Police Inspector Suresh Mirghe), व्याख्याते धर्मराज हांडे (Lecturer Dharmaraj Hande); तसेच पत्रकार संजय दुधाणे (Journalist Sanjay Dudhane) यांना मुळशीरत्न (Mulshiratna) पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेच्या उद्‍घाटनास आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (Former MLA Chandrakant Mokate) उपस्थित राहतील. तर बक्षीस वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil), आमदार संग्राम थोपटे (MLA Sangram Thope) व नीलेश लंके (Nilesh Lanke), राजेंद्र हगवणे (Rajendra Hagavne), शंकर मांडेकर (Shnakr Mandekar), मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आदींच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मुळशी केसरी प्रतिष्ठानचे संस्थापक भास्कर मोहोळ (Bhaskar Mohol, founder of Mulshi Kesari Pratishthan) यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बांदल (Rajendra Bandal, President), सचिव शरद पवार (Secretary Sharad Pawar) उपस्थित असतील.

हेही वाचा - पैलवानांनी कुस्तीवर लक्ष द्यावे कोणावरही अन्याय होणार नाही - संजय कुमार सिंग

ही स्पर्धा पुणे शहर, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) व पुणे जिल्हा (Pune City) यासाठी मर्यादित आहे. मुळशी किताब या खुल्या गटातील यापूर्वी विजेत्या झालेल्या मल्लास या स्पर्धेत खेळता येणार नाही. 45 व 55 किलोचा गट मुळशी तालुक्यापुरता मर्यादित राहील. तसेच, तो 17 वर्षाखालील मुलांसाठी मर्यादित राहील. या गटातील मुलांनी वजन देताना वयाचा पुरावा बरोबर आणावा. पहिलवानांनी 98225 56098 व 77985 73485 या भ्रमणध्वनींवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times               

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes              

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n                 

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes             

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.