Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
हेही वाचा - प्रियकराच्या मदतीने आईनेच केला अडीच वर्षाच्या मुलीचा खून; खडकी मधील घटना
वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार (API Manoj Pawar) यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवनाथ उर्फ पप्पूशेठ नामदेव रेणुसे (वय 38, रा. पाबे, तालुका - वेल्हे, जिल्हा - पुणे) (Navnath Alias Pappusheth Namdeo Renuse) असे खून करण्यात आलेल्या तरुण व्यावसायिकाचे नाव असून, संशयित हल्लेखोरांचा शोध सुरु करण्यात आला आहे.
आज सोमवार दि. 6 मार्च 2023 दुपारी बाराच्या सुमारास l अगोदरच पूर्वतयारीत आलेल्या हल्लेखोरांनी बेछुट गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने गोंधळलेल्या नवनाथ रेणुसे याने हल्ला चुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या शिरल्याने तो पडला.
हेही वाचा - मोबाईल पहाताना रागावली आई; मुलाने गळा दाबून केला तिचा खून
यावेळी हल्लेखोरांनी तेवढ्यावरच न थांबता धारदार शस्त्राने त्याच्या तोंडावर आणि शरीरावर वार केले. काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवनाथ यांचा जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. नेमका हा हल्ला कोणी केला आणि हत्येचे कारण काय हे समजले नसले तरी काही हल्लेखोरांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामध्ये पाच हल्लेखोर दोन मोटरसायकलवरून तोंडाला रूमाल बांधुन पसार झाले. खुन झालेल्या तरुणावर चार गोळ्या झाडल्या असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत आहे. आरोपींचा शोध चालू असून, पूर्ण तालुक्यात नाकाबंदी केली असल्याची माहिती वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.
एकूणच शांत आणि संयमी असलेल्या नवनाथ रेणुसे याच्यावर भरदिवसा झालेल्या हल्ल्याने वेल्हा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पोलिसांची निरनिराळी पथके हल्लेखोरांचा शोध घेत असून, हा पूर्वनियोजित हल्ला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84