Type Here to Get Search Results !

Murlidhar Mohol: युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी या नेत्यांच्या नावाने मागितली ३ कोटींची खंडणी; कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Nurlidhar Mohol Threat Call - checkmate times

पुणे, दि. 27 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचे नाव वापरून 2 जणांनी व्यावसायिकाला खंडणी (Extortion) मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय युवा मोर्चाच्या (Bhartiya Yuva Morcha) कार्यक्रमासाठी 3 कोटी रुपये द्या म्हणून खंडणी मागितल्याचे समोर आले आहे.

याबाबत राजेश व्यास (Rajesh Vyas) यांनी या संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) तक्रार दिली आहे. पुण्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने दोघांनी खंडणी मागण्यात आली. यासंबंधी संदीप पाटील (Sandeep Patil), शेखर ताकवणे (Shekhar Takwane) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांनी त्यांच्या मोबाईलवर "कॉल मी" नावाचे एक ॲप (Call Me App) डाऊनलोड करून त्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. या ॲप द्वारे समोरच्या व्यक्तीला असे भासवले गेले की, हा खरंच मोहोळ यांचाच नंबर आहे. तसेच आरोपींनी मोहोळ यांच्या मावसभावाचा नंबरचा देखील गैरवापर केला.

हेही वाचा बेवड्या भावाने केली करामत; टल्ली होऊन भावाच्या ऑफिसमध्येच बॉंब ठेवल्याचा केला फोन

दोन्ही आरोपींनी या ॲपचा वापर करत पुण्यातील व्यावसायिकाला फोन करून भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमाला पैसे लागणार असून त्यासाठी 3 कोटी रुपये द्या असे सांगून खंडणी मागितली. हा सगळा प्रकार खोटा असल्याचे लक्षात येताच त्या व्यावसायिकाने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ मोबाईल क्रमांकावरून शोध घेत आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.

हेही वाचा - प्रहारच्या कार्यकर्त्याने सामान्य जनतेसाठी एका फोनवर बच्चू कडू आणि तानाजी सावंत यांनाही कामाला लावले

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.