Type Here to Get Search Results !

पुण्यात विकासकामांच्या नावाखाली चाललेली वृक्षतोड थांबवण्यासाठी देशमुख चढले झाडावर

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

ncp protest against tree cutting by pmc - checkmate times

पुणे, दि. 27 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली पुणे महापालिकेने (PMC) नदीपात्रातील हजारो झाडे तोडण्याची तयारी चालविली आहे. पुण्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) याला विरोध दर्शविला असून आज वृक्षतोडीच्या (tree cutting) विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

आंदोलनाची भूमिका समजावून सांगताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Pune City President Prashant Jagtap) यांनी महापालिकेवर कठोर टिका केली. ते म्हणाले की,“नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली पुणे महापालिका प्रशासन सहा हजार झाडांची कत्तल करणार असेल तर हे निश्चितच पुणेकरांच्या दृष्टीने चांगलं चिन्हं नाही. जी झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे ती देशी झाडं असून अनेक पक्षांचा नैसर्गिक अधिवास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा या झाडांच्या कत्तलीला तीव्र विरोध आहे.”

ते पुढे म्हणाले की,”पुणे शहराचा विकास ही व्हायला हवा व पर्यावरणाचे रक्षण ही व्हावे. यांचा सुवर्णमध्य राखण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. यासाठी त्यांनी काम केले पाहिजे. कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास न करता ही झाडे तोडली जात आहेत. एकूण सहा हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार असतानाही केवळ काही झाडे महापालिका पुनर्ररोपन करणार आहे. पण त्यांचे योग्य संगोपन न झाल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही. महापालिका या सर्व झाडाच्या संगोपनाच्या यशस्वितेची खात्री देणार का ?” असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रवक्ते प्रदिप देशमुख (Spokesperson Pradeep Deshmukh) म्हणाले की,”केवळ आपल्या बॉसेसना खुश करण्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे. या सर्व झाडांचे पुनर्रोपण करता येणे अशक्य आहे. आम्ही देखील विकासाचे समर्थक आहोत पण पर्यावरणाचा बळी देऊन होणारा विकास आम्हाला अमान्य आहे.” असं म्हणत आपला निषेध व्यक्त करण्यासाठी प्रवक्ते थेट झाडावर चढले.

हेही वाचा - वृक्षतोड करण्यासाठी परवानगी मागण्याची ही तर वेगळीच पद्धत

यावेळी शहाराघ्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, दिपाली धुमाळ (Deepali Dhumal), किशोर कांबळे (Kishor Kambale), नितीन कदम (Nitin Kadam), अजिंक्य पालकर (Ajinkya Palkar) आदी कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - खणीकर्मामुळे नाशिकच्या त्रंबकेश्वराला मोठा धोका, नागरिकांचा जीव धोक्यात?

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.