Type Here to Get Search Results !

Shivane Pune | शिवणेच्या या भागांमध्ये नवीन जलवाहिन्या टाका; सचिन दांगट यांची पाणीपुरवठा विभाकडे मागणी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

new water channels in shivane sachin dangat - checkmate times

पुणे, दि. 17 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, न्यू कोपरे (Shivane, Uttam Nagar, Kondhave Dhawade, New Kopare) या नव्याने समाविष्ठ झालेल्या चार गावांच्या पाणी प्रश्नासाठी (Water Supply) नेहमीच आग्रही असलेल्या माजी स्वीकृत नगरसेवक सचिन विष्णुपंत दांगट (Former Accepted Corporator Sachin Vishnupant Dangat) यांनी पुन्हा एकदा पाणी प्रश्नावर पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन, काही भागांमध्ये पुणे महानगरपालिका (PMC Water) अथवा प्राधिकरणाकडून (MGP) अजिबातच पाणी देण्यात आले नसल्याचे निदर्शनास आणून देत, तेथे लवकरात लवकर जलवाहिन्यांची व्यवस्था (Demand of Water Lines) करण्याची मागणी केली आहे.

शिवणे गावातील सर्वे नंबर 97 देशमुखवाडी (Deshmukh wadi), सर्वे नंबर 85 प्लॅटिनम कॉलनी (Platinum Colony), कामठे वस्ती (Kamthe Vasti) आणि सर्वे नंबर 84 दांगट पाटील नगर (Dangat Patil Nagar) गॅस गोडाऊन या ठिकाणी जवळपास 4 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकली गेली नाही. यापूर्वी देखील या भागात जलवाहिन्या टाकण्याबाबत सचिन दांगट यांनी पत्रव्यवहार करून देखील या भागात पाणी देण्याविषयी पालिका गांभीर्याने विचार करत नाही. 

या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सचिन दांगट यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता (Executive Engineer, Water Supply Department PMC) अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar) यांची भेट घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगत, पुन्हा एकदा निवेदन दिले.

यावेळी अनिरुद्ध पावसकर यांनी सदर ठिकाणी पाहणी करून, पाईपलाईन टाकण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन सचिन दांगट यांना दिले असल्याचे दांगट यानिक ‘चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले. यापूर्वी देखील मे 2022 ला सचिन दांगट यांच्या नेतृत्वाखाली शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, न्यू कोपरे या नव्याने समाविष्ठ झालेल्या चार गावांच्या पाणी प्रश्नासाठी शिंदे पूल (Shinde Pool, Shivane) चौकात लाक्षणिक उपोषण (Hunger Strike) करण्यात आले होते. 

यावेळी पुणे महानगरपालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर भविष्यात या समस्या सोडवल्या गेल्या नाही तर उग्र आंदोलन (Violent Movement for Water) करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. त्यामुळे आगामी काळात या भागातील पाणी प्रश्नावर उग्र आंदोलन उभारले गेल्यास “त्याला जबाबदार कोण?” असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

हेही वाचा - सचिन दांगट यांच्या कामाबद्दल सांगेल तेवढं कमी आहे; आमदार भिमराव तापकीर यांची स्तुतिसुमने

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                           

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.