Type Here to Get Search Results !

MSRTC: एसटी मध्ये महिलांना कसली आली ५० टक्के सवलत; पुणे ग्रामीण विभागात रोजच्या ४११ फेऱ्या रद्द

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Number of msrtc buses reduced - checkmate times

पुणे, दि. 20 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ताफ्यातील बस गाड्यांची संख्या अजूनही कमी आहे. पूर्वी मंडळाच्या ताफ्यात 18000 बस गाड्या होत्या. ती संख्या आता केवळ 13500 इतकी झाली आहे. त्याचा परिणाम पुण्यासह राज्यभरातील ग्रामीण भागातील (Rural Area) सेवेवर झाला. (pune news)

एकट्या पुणे विभागात रोजच्या ग्रामीण भागातील सुमारे 411 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. तर मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांची संख्याही घटली. पुणे विभागात मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांची संख्या पूर्वी 202 होती, ती आता 130 झाली आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसला आहे.

राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती व बस गाड्यांची स्थिती खराब आहे. सध्या सुमारे पाच हजार एसटी गाड्यांचे आयुर्मान संपल्याने त्यांना प्रवासी सेवेतून बाहेर काढले आहे. तर उर्वरित गाड्या देखभाल-दुरुस्ती (Repairs & Maintenance), आरटीओ (RTO), पोलीस व अन्य तांत्रिक कामांमुळे (Police & Technical Problems) रस्त्यावर धावत नाही. म्हणजे प्रत्यक्षात रस्त्यावर धावणाऱ्या बस गाड्यांची संख्या आणखीनच कमी आहे. म्हणजे, पाच हजारहून अधिक गाड्या प्रवासी सेवेत नाहीत. ग्रामीण भागात कमी उत्पन्नाच्या मार्गावर फेऱ्यांची संख्या घटवण्यात आली आहे. त्याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवाशांना (students and senior citizens from rural area were affected negatively) बसत आहे.

हेही वाचा पीएमपीएमएल’ची ५ रुपयात ५ किलोमीटर बससेवा बंद; पुण्यादशम पण लवकरच बंद होणार?

या डेपोच्या घटल्या फेऱ्या :

डेपो - पूर्वी - आता

भोर - 140 - 104

नारायणगांव - 644 - 544

राजगुरुनगर - 403 - 348

तळेगाव - 128 - 60

शिरूर - 191 - 98

सासवड - 239 - 180

एकूण - 1745 - 1334


तर पुणे विभागाची स्थिती पुढीलप्रमाणे –

दैनंदिन प्रवासी संख्या - 1 लाख

प्रवासी उत्पन्न - सुमारे 85 लाख

एसटी बसची संख्या- 849

रोजची वाहतूक किमी मध्ये - 2 लाख 50 हजार


काही गावांत एसटी बंद किंवा फेऱ्या कमी होतात. पासधारक विद्यार्थ्यांना 4 ते 10 किमीचा प्रवास करत शेजारच्या गावात जावे लागते. विविध कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अडचणी येतात. एसटीच्या नकाशातूनच अनेक गावे हद्दपार झाल्याने, प्रवाशांची गैरसोय होते.

हेही वाचा चांदणी चौकात पुणे-बेंगलोर हायवे वर PMPML Bus-ट्रकची धडक; वाहतूक संथ गतीने सुरु

याबाबत राज्य परिवहन महामंडळाचे (मुंबई) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe, Vice Chairman and Managing Director, State Transport Corporation (Mumbai)) यांनी सांगितले कि,“कोरोनानंतर बसची खरेदी झालेली नाही. त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे बस गाड्याची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. भाडेतत्त्वावर व स्वमालकीच्या गाड्या देखील लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावतील. तेव्हा बस व प्रवाशांची संख्या वाढेल.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.