Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 16 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): आंदेशे (ता. मुळशी) (Andeshe, Mulshi) येथे 9 वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय वृद्ध नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. तसेच नातीच्या वयासमान असलेल्या चिमुरडीवर वृद्धाने केलेल्या अत्याचाराचा तालुक्यातील विविध पक्ष संघटनांच्यावतीने निषेध करण्यात आला. (Pune Crime News)
संतोबा वाघू कंधारे (Santoba Vaghu Kandhare) (वय 78, रा. आंदेशे, ता. मुळशी) असे या नराधमाचे नाव असून त्याला पौड पोलिसांनी (Paud Police) अटक केली आहे. तालुक्याच्या इतिहासात प्रथमच घडलेल्या या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा - आजोबा ना तुम्ही, मग हे काय केलंत?; "जब घर मे कोई नही होता था तब मुझे दादाजी गोद मे बिठाते थे"
मिळालेल्या माहितीनुसार, अत्याचारीत चिमुरडी बौद्ध समाजातील असून इयत्ता दुसरीत शिकते. कंधारे त्यांच्या घराशेजारी राहतो. त्याची मुले पुण्यात राहत असून तो घरी एकटाच राहतो. कंधारे याने या मुलीला कॅडबरी, चॉकलेट, कुरकुरे या खाऊच्या पदार्थाचे आमिष (Lure Of Chocolates) दाखवले. गोड बोलून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार (rape) केला. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी पौड पोलीस ठाण्यात (Paud Police Station) तक्रार केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पौड पोलिसांनी त्याला तात्काळ अटक (Arrest) केली. हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले (Haveli Sub Divisional Police Officer Bhausaheb Dhole) हे पुढील तपास करीत आहे. तथापि ही घटना तालुक्यात पसरताच सर्वत्र खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - Pune Crime: विद्यार्थिनीला गर्भवती केलेल्या क्लास चालकाला दहा वर्षांची सक्तमजुरी
वृद्धत्वाच्या नात्याला काळीमा फासणाऱी ही घटना समजल्यावर विविध स्तरातून त्याचा निषेध करण्यात आला. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या जिल्हा संघटीका स्वाती ढमाले (Swati Dhamale, district convenor of Shiv Sena's Thackeray party) यांनी पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव (PI Manojkumar Yadav) यांना निवेदन देवून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली. वंचित बहुजन आघाडीच्यावतीनेही या घटनेचा निषेध केला गेला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84