Type Here to Get Search Results !

म्हातारपणात सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाला आणि सुनेला त्याने केले संपत्तीतून बेदखल; सर्व संपत्ती केली दान

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 8 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वृद्धापकाळात (Old Age) सेवा न केल्याने उत्तर प्रदेशातील मुझफ्परनगर (Muzaffarnagar) जिल्ह्यातील खतौली (Khatauli) येथे एका 85 वर्षी व्यक्तीने त्यांची कोट्यवधींची मालमत्ता मुलांना न देता राज्यपालांच्या नावे सरकारला दान केल्याची बातमी समोर आली आहे. एवढंच नव्हे तर सरकारने या जागेवर शाळा किंवा रुग्णालय बांधावे, अशी इच्छा व्यक्‍त केली आहे.

हेही वाचा - 'तुमच्या मुलाला लॉटरी लागलीये ...', असे जेष्ठांना लुटण्यासाठीचे आमिष!

मिळालेल्या माहितीनुसार, मुळचे बिराल गावचे (Biral Gaon) रहिवासी असलेले नाथू सिंह (Nathu Singh) यांच्या कुटुंबात 4 मुली आणि एक मुलगा आहे. मुलींची लग्ने झाली आहेत. तर मुलगा लग्नानंतर सहारनपूरमध्ये (Sahanpur) कुटुंबासोबत राहतो. येथे तो सरकारी शिक्षक (Government Teacher) म्हणून काम करतो. नाथू सिंह यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर मुलांनी त्यांना एकटे सोडले. सध्या नाथू सिंह हे खतौली शहरातील एका आश्रमात राहत आहेत. गेल्या 7-8 महिन्यांपासून ते आश्रमात राहत आहेत.

यादरम्यान त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांना भेटायला आला नाही. 85 वर्षीय नाथू सिंह यांच्या मुलांनी त्यांची काळजी घेतली नाही. यामुळे, मुलांवर रागावलेल्या नाथू सिंहने आता त्यांना आपल्या मालमत्तेतून बेदखल केले आहे. यासोबतच ही संपत्ती उत्तर प्रदेश सरकारच्या (Uttar Pradesh Government) नावावर करण्यात आली आहे. नाथू सिंह यांच्या मालमत्तेची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे.

हेही वाचा - वाट चुकलेल्या ७० वर्षांच्या महिलेला शांतिबन केअर सेंटर’ने दिला आसरा; ओळख पटवण्याचे आवाहन

मृत्यूपत्रात त्यांनी लिहिले आहे की, त्यांच्या जमिनीवर सरकारने शाळा किंवा रुग्णालय बांधावे. इतकंच नाही तर नाथू सिंह यांनी मुलांकडून अंत्यसंस्काराचा अधिकारही काढून घेतला असून मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

खतौली वर्धा आश्रमाच्या संचालिका रेखा सिंह (Director of Khatauli Wardha Ashram Rekha Singh) यांनी सांगितले की,”नाथू सिंह जी अनेक महिन्यांपासून वर्धा आश्रमात राहत आहेत. कुटुंबातील कोणीही सदस्य त्यांना एकदाही भेटायला आला नाही. नथू सिंह यांनी शनिवारी तहसील गाठले आणि आपली सर्व मालमत्ता उत्तर प्रदेश सरकारला सुपूर्द केली. नाथू सिंह यांच्या मालमत्तेत एक घर आणि सुमारे 10 एकर शेतजमीन आहे.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/              

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times             

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes              

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes            

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n               

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes           

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.