Type Here to Get Search Results !

पौड फाटा ते बालभारती रस्त्याचा खर्च वाढता वाढता वाढे; घेई कोटीच्या कोटी उड्डाणे

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 10 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): कोथरूड (Kothrud) आणि सेनापती बापट रस्त्याला (Senapati Bapat Road) जोडण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून बालभारती (Balbharati) ते पौड फाटा (Paud Phata) हा नवीन प्रकल्प महापालिका हाती घेत असताना काम सुरू होण्यापूर्वीच याचा खर्च तब्बल 16 कोटी रुपयांनी वाढून 252 कोटी 13 लाख रुपये इतका झाला आहे. या भागातील एका खासगी विकसकाच्या बांधकामामुळे महापालिकेला सुमारे 125 मीटरचा रस्त्याची जागा बदलावी लागल्याने हा खर्च वाढला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Pune News)

हेही वाचा - पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीवर नवा उपाय; विद्यापीठातील शॉर्ट कट खुला

महापालिकेने कर्वे रस्ता (Karve Road), पौड रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता (Vidhi Highschool Road), सेनापती बापट रस्ता या भागातील वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी बालभारतीपासून वेताळ टेकडीवरून (Vetal Tekdi) थेट पौड फाट्यापर्यंत (Paud Phata) रस्ता केला जाणार आहे. हा रस्ता टेकडीवरून जाणार असल्याने येथील पर्यावरणाची हानी होणार असल्याने पर्यावरण प्रेमी नागरिक व संघटनांनी यास विरोध केला आहे. पण भविष्यातील पुणेकरांची गरज ओळखून महापालिकेने हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला.

या रस्त्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला, त्यांच्याकडून या परिसराचा अभ्यास करून त्याचा अहवाल महापालिकेला सादर केला. त्यामध्ये महापालिकेने काही रस्ता हा जमिनीवरून तर काही भाग हा इलोव्हेटेड असणार आहे. या इलोव्हेटेड मार्गामुळे टेकडीफोड होणार नाही, असे महापालकेने सांगितले आहे.

हेही वाचा - वेताळ टेकडीवरून बालभारती पौड फाटा रस्ता ठरेल डोकेदुखी; रस्ता तज्ञ समितीचे प्रशांत इनामदार यांची मागणी

दरम्यान, या रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरू होणार असताना पौड फाटा भागातील खाणीमुळे काम करताना अडचणी येणार होत्या, तसेच एका बांधकाम व्यावसायिकाच्या जागेतून व झोपड्याही रस्त्याच्या कामात येत असल्याने या रस्‍त्याची जागा बदलावी लागणार आहेत. दुसऱ्या भागातून हा रस्ता पौड फाट्याला जोडला जाईल. हा बदल केल्याने प्रकल्पाचा खर्च 235 कोटी वरून 252 कोटी 13 लाखापर्यत गेला आहे.


या नवीन रस्त्याबद्दल माहिती पुढीलप्रमाणे -

· रस्त्याची एकूण लांबी – 1.8 किलोमीटर

· यापैकी इलोव्हेटेड रस्ता - 400 मीटर

· रस्त्याची रुंदी - 30 मीटर

· अंदाजे खर्च 252.13 कोटी

“बालभारती ते पौड रस्ता या रस्त्यासाठी 236 कोटी रुपये खर्च पुणे महापालिकेने अपेक्षित धरला होता. मात्र एका बांधकाम व्यावसायिकाची आड आल्याने रस्त्याची अलायमेंट बदलण्यात आली आहे. सुमारे 125 मीटरने रस्ता बदलला असून, यामुळे प्रकल्पाचा खर्च 16 कोटी रुपयांनी वाढला. या प्रकल्पाची निविदा सोमवारी काढली जाणार आहे.” असे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी (Head of Road Department V. G. Kulkarni) यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times               

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes              

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n                 

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes             

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.