Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 23 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): दौंड रेल्वे स्थानकावर (Daund Railway Station) मालगाडीच्या वर चढून वीजवाहिनीला स्पर्श करण्याची धमकी देणाऱ्या (Threat to touch powerline above railway) एका विमनस्क तरूणास शिताफीने खाली उतरविण्यात आले आहे. रेल्वे कर्मचार्यांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली आहे. (pune crime news)
दौंड रेल्वे स्थानकावरील तरुणाचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. - https://twitter.com/checkmate_times/status/1638810763317121026
मिळालेली माहिती अशी कि, रेल्वे स्थानकात सकाळी पावणेआठ वाजता फलाट क्रमांक पाच व दोन मधील मेन लाइन वर थांबलेल्या मालगाडीवर एक तरूण चढला. डब्यावर चढून तो त्यावरील उच्च क्षमतेच्या वीजवाहिनीला स्पर्श करून आत्महत्या करणार असल्याची धमकी देत होता. दरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या रेल्वे कर्मचारी (Railway employees) व अधिकार्यांनी (Officers) ही माहिती वरिष्ठांना देताच त्या वाहिनीचा वीजपुरवठा खंडित (Power outage) करण्यात आला.
कर्मचारी त्याला खाली उतरण्याचे आवाहन करीत होते परंतु तो हात उंचावून स्पर्श करण्याची धमकी देत होता. दरम्यान, एका रेल्वे कर्मचाऱ्याने डब्यावर चढून त्याला धरले आणि दुसऱ्या बाजूने अन्य एकाने त्याला धरून खाली उतरविले. खाली उतरताच तरूणाने पळायचा प्रयत्न केला. परंतु त्याला पकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या (Railway Security Force) ताब्यात देण्यात आले. सदर तरूण हा मध्यरात्रीपासून दौंड स्थानकावर ओरडत फिरत होता.
हेही वाचा - वेगवान 'वंदे भारत’ला दौंड मध्ये ब्रेक लावा; भाजप आमदार राहुल कुल यांची मागणी
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84