Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 29 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): देशातील पहिली ‘स्मार्ट सिटी’ म्हणविणाऱ्या पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प (PMC Budget) सादर होऊन पाच दिवस उलटले, तरीही पालिकेच्या संकेतस्थळावर अर्थसंकल्प प्रसिद्ध केला नाही.
पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार (Pune Municipal Corporation Commissioner Vikram Kumar) यांनी शुक्रवारी महापालिकेचा सादर केलेला अर्थसंकल्प नागरिकांपासूनच अर्थसंकल्प दडवून ठेवण्याचे कारण काय?, अशी टीका सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Citizen Forum President Vivek Velankar) यांनी केली आहे.
याविषयी वेलणकर म्हणाले,”नागरिकांच्या करांच्या पैशाचे नियोजन अर्थसंकल्पामधून होत असते. मात्र तोच अर्थसंकल्प नागरिकांपासून दडवून ठेवण्याचे कारण काय?, याचे गौडबंगाल उलगडत नाही. महापालिकेने संकेतस्थळावर अर्थसंकल्प त्वरित प्रसिद्ध करावा.”
हेही वाचा - पुरंदर विमानतळ होणार नाही, पुण्याच्या मेट्रो प्रकल्पासाठी देखील अर्थसंकल्पात तरतूद नाही?
सुमारे साडेनऊ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना कुमार यांनी वाहतूक कोंडी, रस्ते, पाणी पुरवठा व सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांना गती देण्याचा विचार व्यक्त केला होता. अभ्यासक, तज्ज्ञ व सर्वसामान्य नागरिकांकडून पालिकेच्या संकेतस्थळावरून अर्थसंकल्पाची सविस्तर माहिती घेतली जात आहे. मात्र, अद्यापही संकेतस्थळावर अर्थसंकल्प प्रसिद्ध झाला नाही.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84