Type Here to Get Search Results !

PMC Pune: उद्यापासून पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

pmc contractors hunger strike till death - checkmate times

पुणे, दि. 27 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): महापालिकेत (PMC Pune) काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या (Contract Employees) समस्या तशाच आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उद्यापासून पुणे महापालिका गेटवर आमरण उपोषण (Hunger strike) करण्यात येणार आहे. अशी भूमिका राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनिल शिंदे (RMS president Sunil Shinde) यांनी घेतली आहे. 

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या (Contractors) समस्या संदर्भात काँग्रेस भवन पुणे (Congress Bhavan, Pune) येथे बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व कामगार नेते सुनील शिंदे (Sunil Shinde, president and labor leader of RMS) यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले,”अजूनही जवळजवळ 200 सुरक्षारक्षकांना कामावर घेण्यात आलेले नाही. या संदर्भामध्ये यापूर्वीच आयुक्तांनी मान्य करूनही सर्व कामगार गेली पाच महिन्यापासून कामापासून वंचित आहेत. त्यांना पगारही देण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे कायम कामगारांना एक पगार आणि 19 हजार रुपये एवढा बोनस देण्यात आला, तेवढाच बोनस सर्व कंत्राटी कामगारांना देण्यात यावा. ही मागणी मान्य करूनही अजून त्याच्यावर अंमलबजावणी झालेली नाही. ‘ईएसआयसी’चे कार्ड (ESIC Card) अजूनही कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आलेच नाही.”

हेही वाचा - Pune news | पुणे मनपाच्या शाळेच्या दुरावस्थेला वाचा फोडण्यासाठी बालेवाडी मध्ये उपोषण

तसेच “या व अशा अनेक प्रश्नांसाठी मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पुणे मनपाच्या गेटवर हे सर्व कर्मचारी आमरण उपोषण आंदोलन सुरू करणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत कोणीही त्या जागेवरून उठणार नाही.” असे ही शिंदे म्हणाले. 

हेही वाचा - सिंहगड रस्त्यावरील डीपी रस्त्यांचा प्रश्न लागणार मार्गी; आम आदमी पार्टीने दिला होता उपोषणाचा इशारा

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.